spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रामदास आठवलें म्हणाले, फडणवीसांचा कुठलाही हात नाही…

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची जबाबदारी ही आता मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (DCM) यांचीच असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी पालघरमध्ये केलं आहे. ते पालघर येथे रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्याला आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं, आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

जालन्यात (Jalna) मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नसल्याचा वक्तव्यही रामदास आठवले यांनी यावेळी केलं आहे. लाठीचार्ज करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश दिले नसल्याचा दावाच रामदास आठवलेंनी यावेळी केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाईला दोन जागा मिळण्यासाठी आम्ही आग्रही असून आपण शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषदेत केली. २०१९ च्या निवडणुकीत आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला असला तरी सध्या आपला तिथे जनसंपर्क चांगला असून यावेळेस निश्चितच निवडून येऊ असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

भाजप (BJP) म्हणजेच हिंदुत्व नाही तर आपण सगळेच हिंदू आहोत, त्यामुळे कोणी अपप्रचार करत असेल तर इतर समाजांनी त्याचा विचार न करता पूर्वीचा भाजप हा आताचा भाजप राहिला नाही, त्यामुळे आता सर्व जाती धर्मातील लोक ही भाजपला मतदान करत असल्याचं रामदास आठवले यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विकासात्मक बोलत असून इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणताही उमेदवार नसल्यानं त्यांना जनता मतदान करणार नाही असंही आठवले यावेळी म्हणाले.

हे ही वाचा: 

जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर आमदार बच्चू कडूंनी दिली प्रतिक्रिया…

Asia Cup 2023 IND vs NEP, रोहित अणि शुबमनची दमदार खेळी, टीम इंडियाचा सुपर ४ मध्ये प्रवेश…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss