spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यभरात दहीहंडी उत्सव जोशात

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काळात दहीहंडी (Dahihandi) हा सण खूप प्रसिद्ध आहे. बालगोपाळयाच्या जन्मानिमित्त दहीहंडी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काळात दहीहंडी (Dahihandi) हा सण खूप प्रसिद्ध आहे. बालगोपाळयाच्या जन्मानिमित्त दहीहंडी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे.पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. देशातील श्रीकृष्णाच्या लाखो मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.मध्यरात्रीपासून दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे.मथुरामध्ये (Mathura) दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे. मथुरेतील मंदिरांना रोषणाई केली आहे. तर मुंबईसह देशातील इस्कॉन (ISKCON) मंदिरांमध्ये भक्तीचा सागर दिसून येत आहे. आज कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने देशभर उत्साह आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ठाण्यामध्ये मनसेने दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहिहंडीमध्ये मुंबई, ठाण्यामधील सर्व पथक सलामी देण्यासाठी जातात. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी आजोजित केलेल्या या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक ९ थर रचणार आहेत. तर संध्याकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) दहीहंडीच्या ठिकाणी हजेरी लावतील. राज ठाकरे उपस्थित झाल्यानंतर जय जावं पथक १० थरांची हंडी लावून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर या दहिहंडीमध्ये १० थर लावणाऱ्या पथकाला ११ लाखाचं बक्षिस देण्यात येणार आहे. तर प्रताप सरनाईक यानाच्या दहीहंडीची सुरुवात ९ थरांनी होणार आहे. या ठिकाणी जय जवान आणि कोकण नगर मंडळ दाखल झाली आहेत.

ठाण्यातील मानाच्या हंडीची सुरवात आनंद दिघे (Anand dighe) यांनी केली होती. ठाण्यातील टेंभी नाका येथे पहिल्या गोविंदा पथकाचे आगमन झाले आहे. मुसळधार पावसात गोविंदा थर लावणार आहेत. तर मुलुंड मधील साईराज गोविंदा पथकाचे गोविंदा थर लावून सलामी देणार आहेत. मनाच्या हंडीच्या ठिकाण थर लावण्यासाठी सर्व गोविंदा पथकातील गोविंदा सज्ज झाले आहेत. आळंदीमध्ये देखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरा करण्यात येत आहे. यावेळी महाराजांच्या समाधीचा भाग फुलांनी सजवण्यात आला आहे. तर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली आहे.

हे ही वाचा:

राशिभविष्य, ७ सप्टेंबर २०२३, मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. 

लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका कश्यामुळे वाढलाय? ‘या’ सवयी ठरतात कारणीभूत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss