spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dahi Handi 2023, आज दहीहंडीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या अदाने केलं सर्वांना घायाळ…

गौतमी पाटील (Gautami Patil) एक भारतीय नृत्यांगना (Dancer) आणि सोशल मीडिया स्टार (social media star) आहे.

गौतमी पाटील (Gautami Patil) एक भारतीय नृत्यांगना (Dancer) आणि सोशल मीडिया स्टार (social media star) आहे. तिचा जन्म १९९६ मध्ये शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. ती एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर नृत्यांगना आहे. तिने शिंदखेडा येथील हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी तिने नृत्य शिकायला सुरुवात केली. तिचे बरेच चाहते आहेत, इंस्टाग्रामवर तिचे ८५९ हजार फॉलोअर्स आहेत. तिने अनेक गाण्यांमध्ये मॉडेल म्हणून काम केले आहे.

आज राज्यात दही हंडीचा (Dahi Handi) उत्साह आहे. खासकरुन मुंबईतील ठाण्यात (Thane) दही हंडी जोरात सुरु आहे. आजच्या या उत्सवाला अनेक सेलिब्रिटी भेट देत आहेत.
मागाठाणे (Magathane) येथे तारामती चॅरिटेबल फऊंडेशनचा (Taramati Charitable Foundation) दहीहंडी उत्सव सुरु आहे. या ठिकाणी प्रसिद्ध नृत्यांगन गौतमी पाटील आली होती.
गौतमी पाटीलने या कार्यक्रमात तिच्या नृत्याच्या अदा दाखवल्या. तिच्या आकर्षक अदांनी उपस्थित प्रेक्षक घायाळ झाले.
गौतमी पाटीलने मागाठाणे येथील उत्सवात बिनधास्त नृत्य केलं. तिच्या वडिलांच नुकतच निधन झालं आहे.
गौतमी पाटीलबद्दल तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिने नृत्याला सुरुवात करताच ही क्रेझ अधिक प्रकर्षाने जाणवली. गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

हे ही वाचा: 

दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समुदायाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अजित पवार करणार पुण्यात शक्तिप्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss