spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांच्या टीकेमुळे पावसाळी अधिवेशनाआधी तापणार महाराष्ट्रातील राजकारण

अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना

शिंदे – फडणवीस सरकारच पहिलच पावसाळी अधिवेशन चांगलच गाजण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदेसरकावर शेतकरी मदत आणि मागील सरकारच्या काळातील निर्णयांना दिलेली स्थगिती या मुद्द्यावरुन टीका केलेली दिसून आलय. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या परिषदेत अजित पवारांच्या प्रत्येक टीकेला ते सडेतोड उत्तर देताना दिसून आलेत. आमचं सरकार हे बाळासाहेबांच्या भूमिकेवळ स्थापन झालेलं सरकार आहे आणि जरा आमचं सरकार बेइमान व विश्वासघातकी सरकार असतं तर, लोकांनी आमच्या सरकारला एवढी साथ आणि प्रतिसाद दिलाच नसता,असं म्हणत शिंदेंनी विरोधी पक्षनेत्यांनी टोला लगावला आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे कारण ते सरकार तर तेच चालवत होते ना, असा टोलाही शिंदे यांनी लगावलाय. तसंच सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे म्हणाले.

शिंदे सरकारने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, निसर्ग आम्हाला साथ देत आहे. महाष्ट्राच्या इतिहासात दुष्काळी स्थिती नसण्याचा योग हा दुर्मिळच आहे आणि यावर्षी तो जुळून आलाय. विरोधकांनी आम्हाला ७ ते ८ पानी पत्र पाठवले. मला वाटलं हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. तसेच यावेळी सरकारने ४० दिवसात ७५० निर्णय घेतले आणि अनेक स्थगित कामांना पुन्हा एकदा सुरुवात केल्याचही ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या ५० हजार रुपयांच्या अनुदानाच्या प्रश्नावरसुद्धा त्यांनी भाष्य केले. धर्मवीर चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले की एकनाथ कुठेय? या अजित पवारांच्या प्रश्नालादेखील एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत ते म्हणाले, मी माझ्या जागेवरच आहे. निर्णय घ्यायला खंबीरपणे उभं राहावं लागतं.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आधीच्या काळात एनडीआरएफट्या निकषाप्रमाणे ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर मदत दिली होती. त्यानंतर जून, जुलैमध्ये १० हजार प्रति हेक्टर दिले होते. आता आमच्या सरकारने १३ हजार ६०० प्रति हेक्टर मदत करण्याचा निर्णय घेतलाय. बागायती पिकं होती त्याला १७ हजार प्रति हेक्टरचा निर्णय होता. आपण २७ हजार प्रति हेक्टर मदत जाहीर केलीय. बहुवार्षिक जी पिकं असतात त्याला २५ हजार प्रति हेक्टरी होते. ती आपण ३७ हजार प्रति हेक्टर केलीय. तसंच आपण दोन हेक्टरची मर्यादा आणि तीन हेक्टरवर नेली आहे, असा दावा केला आहे.

लोकाभिमुख कामांना प्राधान्य दिले जाईल. सत्तेचा दुपयोग करत, सूडबुद्धीने काम होणार नाही, असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शेवटच्या दोन कॅबिनेटमध्ये तिनशे, चारशे जीआर काढले. गरज एक रुपयाची आणि निधी १० रुपये असा निर्णय आपल्याला घेता येणार नाहीत. मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा दिल्यानंतर काही निर्णय घेतले गेले आहेत. तर त्याकडे आम्ही पाहायचं नाही का? प्रत्येक कामाचा, निर्णयाचा आढावा घेतला जाईल आणि कामांना प्राधान्य दिले जाईल.

मुख्यमंत्र्यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा…

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरु करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयाची सुरुवात २८ सप्टेंबर रोजी मुंबईत केली जाणार आहे.

यावर्षी १५ ऑगस्ट रोजी ७५ वयवर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत बस प्रवास करता येणार.

दहीहंडी निम्मित गोविंदांना १० लाख रुपयांच्या विम्याचा कवच देण्यात येणार आहे आणि त्याचे हफ्ते हे सरकारतर्फे भरण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

उद्या राज्यभर सामूहिक “राष्ट्रगीत गायन”

Latest Posts

Don't Miss