spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ग्रीक चवीच्या काकडीचं करा आता ‘ग्रीक कुकुंबर रायता

काकडीची कोथिंबीर, टोमॅटोची कोथिंबीर आणि पत्ताकोबीची अश्या कोथिंबीर जेव्हा जेवणात असतात तेव्हा जेवणाची आणखी मज्जाच वाढते.

काकडीची कोथिंबीर, टोमॅटोची कोथिंबीर आणि पत्ताकोबीची अश्या कोथिंबीर जेव्हा जेवणात असतात तेव्हा जेवणाची आणखी मज्जाच वाढते. जेवणात जेव्हा वरण भातासोबत जेवणाच्या चवीला कोथिंबीर असली तरी ही अश्या वेळी जमून जाते. शरिरात पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्वाची प्राप्ती होण्यासाठी काकडी खूप लाभदायक ठरते. काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यासाठी काकडीची कोशिंबीर तर आपण नेहमीच करतो. आता तिच्यात थोडस वेगळेपण आणण्याचा विचार करूयात. नेहमीच्या पदार्थापेक्षा थोडं वेगळ असं ग्रीक कुकुंबर रायता ची रेसिपी जाणुन घेऊया.

साहित्य –
२ मध्यम आकाराच्या काकड्या
अर्धी वाटी दही
१ टीस्पून चाट मसाला
१ टीस्पून काळ मीठ
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टीस्पून किसलेलं आलं
२ टेबलस्पून बारीक चिरलेला पुदिना
मीठ (चवीनुसार)
चिमूटभर साखर

कृती –
सर्वप्रथम एका छोट्या वाटीत बारीक चिरलेला लसूण आणि किसलेलं आल अर्धी वाटी पाण्यात भिजत ठेवा. काकडी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. काकडीची साले काढून घ्या. काकडीची साले काढल्यावर ती बारीक कापून घ्या.आता एका मोठ्या भांड्यात अर्धी वाटी दही घ्या. त्या दहीमध्ये चाट मसाला, काळ मीठ आणि चवीनुसार थोडी साखर घाला आणि दही नीट व्यवस्थित फेटून घ्या. ते मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये आता बारीक चिरलेली काकडी आणि बारीक चिरलेला पुदिना घाला. त्यानंतर त्यात आलं- लसूण भिजत ठेवले होते ते पाणी घाला. त्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घातली की सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित फेटून घ्या. अश्या पद्धतीने सोपा असा ग्रीक कुकुंबर रायता झाला तयार. जेवणाचा पदार्थ कोणताही असला तरी या रायत्या त्यासोबत अगदी सहज चालून जाईल.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss