spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शाहरुख खानचा जवान चित्रपट पाहिल्यावर, अभिनेता क्षितिज दातेनी शेअर केली खास पोस्ट

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सर्वांच्या भेटीस आला आहे. अनेक जणांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून जवान या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे.

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सर्वांच्या भेटीस आला आहे. अनेक जणांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून जवान या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. एक मराठमोळ्या अभिनेत्याने जवान या चित्रपटाबाबत एक खास पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. या अभिनेत्यानं या पोस्टच्या माध्यमातून जवान चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूप कौतुक केले आहे.

अभिनेता क्षितिज दातेनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे कि, ‘मी जवान चित्रपट बघितला. डीओपी, एडिटर आणि एकूणच टेक्निकल आर्टिस्ट टीमला डोक्यावर घेऊन वरात काढायाला हवी. इनसेन, जस्ट इनसेन, बाकी मौज’ क्षितिज दातेच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. सगळीकडे त्यांच्या पोस्टची चर्चा सुरु झाली आहे. क्षितिज दातेंनी ‘लोकमान्य’ या मालिकेत लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती. त्याने धर्मवीर आणि मुळशी पॅटर्न यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येतो. धर्मवीर या चित्रपटात त्यानं एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. क्षितीश दाते हा सोशल मीडियावर त्याच्या प्रोजेक्ट्सची माहिती सर्व चाहत्यांना देतो. त्याला इन्स्टाग्रामवर ३५.३K फॉलोवर्स आहेत.

जवान चित्रपटाच सध्या अनेक जण खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील डायलॉग्स, गाणी आणि चित्रपटामधील सीन या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सध्या सोशल मीडियावर सिनेमागृह बाहेरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये शाहरुखचे चाहते हे जल्लोष करताना दिसत आहेत. या चित्रपटामधील अक्शन सीन्सचे अनेकजण खूप कौतुक करत आहेत. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा आणि गिरिजा ओक या कलाकारांनी काम केलं आहे. जवान चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. जवान चित्रपटाच दिग्दर्शन ऑटलीने केलं आहे. जवान चित्रपटामधील ‘जिंदा बंदा’, ‘चलेया’ आणि ‘नॉट रमैया वस्तावैया’ ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळाली.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss