spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

परभणी हादरली, पैशाच्या वादातून १४ वर्षीय मुलाची केली हत्त्या

राज्यभरातील सगळ्याच जिह्ल्यात खून, अपहरण, हत्त्या यासारख्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना परभणीमध्ये (parbhani) घडली आहे.

राज्यभरातील सगळ्याच जिह्ल्यात खून, अपहरण, हत्त्या यासारख्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना परभणीमध्ये (parbhani) घडली आहे. उसनावारीने घेतलेले पैसे परत न केल्याचा राग मनात ठेवून एका १४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मोठा भाऊ घेतले पैसे परत देत नसल्याचा राग मनात ठेवून धाकट्या भावाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याची हत्त्या करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

परभणीमधील पुर्णा तालुक्यातील माटेगाव गाव येथे प्रकाश बोबडे यांच्या १४ वर्षीय लहान मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहेत. अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी पोलिसची चार पथक तयार करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात बालाजी चव्हाण आणि नरेश जाधव या दोन तरुणांची नावे समोर आली. हे दोन्ही आरोपी पसार असल्याचे पोलिसांना समजले. या दोन तरुणांनी त्याचा भाऊ उधार घेतलेले पैसे पार्ट देत नसल्याच्या रागातून मारल्याचे समोर आले आहे. त्या रागात त्यांनी १४ वर्षीय मुलाचे अपहरण केले. त्यांनतर त्यांनी त्याचे हात-पाय आणि तोंड बांधून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे नेले. आणि त्याच ठिकाणी जाऊन त्याला संपवले आणि त्याचा मृतदेह टाकून पसार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्या दोन तरुणांना शोधून काढले आहे. ३५ हजार रुपयांसाठी या दोन जणांनी १४ वर्षीय बालकास अपहरण करून त्याची हत्या केल्याने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.

परभणीतील सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव इथल्या उपसरपंच शशिकला कांबळे साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे हे सर्व जण आले आणि तुम्ही उपसरपंच पदाचा राजीनामा द्या असे म्हणत जोरदार वाद घातला. या वादानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. मारहाणीत उपसरपंच शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळे या रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा: 

भंडारा उधळ्यानंतर विखे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

G २० परिषद म्हणजे नक्की काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss