spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोहित कंबोज यांच्या सूचक ट्वीटवर, राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

अनेकदा आपल्या विधानावरून चर्चेत असलेले भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटर वरून एक सूचक ट्वीट करत राष्ट्रवादीला डिवचला आहे. त्यांनी ट्वीट मधून म्हटले, ” लवकरच राष्ट्रवादीचा नेता देशमुख आणि मलिकंना भेटणार” असे त्यांनी आपल्या ट्वीट मधून म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आता या प्रकणावरू राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. कंबोज यांच्या ट्वीट नंतर राष्ट्रवीदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत मोहित कंबोज कधीपासून एवढे मोठे नेते झाले अशी टीका केली आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण ? तसंच कोणत्या नेत्याचा ते पर्दाफाश करणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिला, ” संपूर्ण देशभर गुंड प्रवृत्तीचे लोक सुटलेले आहेत. ज्यांच्या खुनाचे आरोप आहेत त्यांचे पुढं काय झालं. त्याची माहिती कंबोज आणि चित्रा वाघ यांनी दिली पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदींचे भाषण ऐकले त्यात त्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे असे विधान केले. हाच का सन्मान असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मोहित कंबोज हे याबाबत सविस्तर संवाद साधार आहते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटलं. त्यामध्ये संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि संपत्तीची यादी पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांच्या टीकेमुळे पावसाळी अधिवेशनाआधी तापणार महाराष्ट्रातील राजकारण

Latest Posts

Don't Miss