spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिटरचा शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू

औरंगाबादमधील (Aurangabad) सिल्लोडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घरात हिटर (hitter) लावताना विजेचा शॉक लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

औरंगाबादमधील (Aurangabad) सिल्लोडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घरात हिटर (hitter) लावताना विजेचा शॉक लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी संध्यकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. स्वाती विष्णू काजले (वय२३ वर्षे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना पोलिसांना समजतच पोलीस देखील रुग्णालयात दाखल केले. तर शनिवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्यावर दुपारी रेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सिल्लोडच्या रेलगाव येथील स्वाती काजले यांनी शुक्रवारी संध्याकाळी पाणी गरम करण्यासाठी हिटर लावला. त्यावेळी स्वाती याना हिटरचा शॉक लागला. आणि त्यात त्या दूरवर फेकल्या गेल्या. ही घटना त्याच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी स्वाती यांस रुग्णलयात दाखल केले . पण डॉक्टरनी स्वाती यांस मयत घोषित केले.

दौलताबाद हायवातील मुरूम खाली करत असताना विद्युत तारेला स्पर्श होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना शनिवारी तीन वाजताच्या सुमारास घडली होती. ही घटना करोडी येथे आरटीओ ऑफीससमोर घडली. मंगलसिंग नरसिंग ठाकूर (वय ४७ वर्षे, रा. फतीयाबाद) असे मृताचे नाव आहे. शरणापूर- सहजापूर रस्त्याचे काम चालू असून त्या रस्तावर मुरूम टाकण्याचे काम चालू होते. शनिवारी दुपारी मुरूम टाकण्यासाठी चालक मंगलसिंग ठाकूर हे करोडी येथे आरटीओ ऑफीससमोर आले होते. हायवाची हायड्रोलीक वर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या तारेचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे हायवाच्या ट्रॉलीचा स्पर्श विद्युत तारेला झाला. त्या तारीचा स्पर्श होताच मंगलसिंग ठाकूर याना शॉक लागला आणि ते जागेवरच बेशुद्ध पडले.

ही घटना त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी मंगलसिंग ठाकूर याना घाटी रुग्णलयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरानी तपासल्यानंतर मंगलसिंग ठाकूर याना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारताकडून उचलण्यात आले महत्वाचे पाऊल देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीत केले हे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss