spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाणे पाठोपाठ आता मराठवाड्यात देखील चक्क जामची हाक

जालन्यामध्ये मागील एक आठवड्यापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनाकर्ता बसले आहेत.

जालन्यामध्ये मागील एक आठवड्यापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनाकर्ता बसले आहेत. त्याच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर काही ठिकाणी बस जाळण्यात आल्या. तर १६ सप्टेंबर रोजी मराठवाडा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याचे आव्हान मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी दिली आहे.

अंतरवली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक नागरिक आणि पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करणे, गावकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात येत आहे.या मागणीसाठी सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहेत. तर आजपासून जालन्यातील आजूबाजूची गावात आणि तालुक्यात अतिशय शांततेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच १६ सप्टेंबर रोजी मराठवाडा जिल्ह्यात चक्का जामची हाक देण्यात आली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे हे करत आहेत. पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यामध्ये पोलिसांनी नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनीच लाठीमार करून आंदोलन चिघळवले आणि त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. मनोज जरांगे देखील हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

राज्यभर मराठा आंदोलनाचे पडसाद उमटल्यांनंतर ठिकठिकणी रस्ता रोको आंदोलन, बस जाळण्यात आल्या. त्यानंतर राज्यभरातील गावागावात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.मराठा आरक्षणाच्या पार्शवभूमीवर मराठवाडामध्ये चक्का जाम करण्यात येणार आहे.

हे ही वाचा: 

हेरंब कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, G 20 च्या खर्चाची केली उजळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss