spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि वॉच ५ प्रो ची प्री-बुकिंग सुरू

अलीकडेच सॅमसंगने भारतात आपले दोन नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत. भारतात सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि गॅलेक्सी वॉच ५ प्रो ची भारतात प्री बुकिंग हि आजपासून सुरु झाली आहे.

अलीकडेच सॅमसंगने भारतात आपले दोन नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत. भारतात सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि गॅलेक्सी वॉच ५ प्रो ची भारतात प्री बुकिंग हि आजपासून सुरु झाली आहे. या दोन्ही स्मार्टवॉचची वैशिष्ट्ये आणि किंमत कंपनीने आधीच उघड केली होती. सॅमसंगने (Samsung) काही काळाआधीच Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Buds 2 Pro यांच्यासोबत Galaxy Watch 5 सीरीज जागतिक स्तरावर लाँच केली आहे. Samsung Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro भारतात किती किंमतीला उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Watch 5 आणि Samsung Galaxy Watch 5 Pro ची प्री-बुकींग Samsung.com या अधिकृत वेबसाईटवर करता येईल. तसेच ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून खरेदी देखील करू शकतात. गॅलेक्सी वॉच ५ ची किंमत हि २७,९९९ रुपये आहे तर आणि वॉच ५ प्रो ची किंमत ४४,९९९ रुपये आहे. परंतु या दोन्ही स्मार्टवॉच साठी अनेक सवलती आणि ऑफर्स देखील दिल्या जात आहे.

Samsung Galaxy Watch 5 च्या ४० mm आवृत्ती आणि ४४ mm आवृत्तीवर एकाधिक बँक कार्ड वापरल्यास ३,००० रुपये कॅशबॅक दिला जाणार आहे. कंपनीने गॅलेक्सी वॉच ५ चा ४० mm ग्रेफाइट, सिल्व्हर आणि पिंक गोल्ड कलर असे कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले आहेत आणि त्याचे ४४ mm वेरिएंट ग्रेफाइट, सिल्व्हर आणि सॅफायर कलरमध्ये लॉन्च केले आहे. दुसरीकडे, जर गॅलेक्सी वॉच ५ प्रो हे ग्रे टायटॅनियम आणि ब्लॅक टायटॅनियम रंगात सादर केला गेला आहे. बँक कार्ड वापरून, तुम्ही यामध्ये ५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकाल. गॅलेक्सी वॉच ५ सीरिजच्या प्री-बुकिंगवर, ग्राहकांना Galaxy Buds 2 फक्त २,९९९ रुपयांमध्ये दिला जाईल आणि जुन्या डिव्हाइसची देवाणघेवाण करण्यावर ५,००० रुपयांची सूट देखील दिली जाणार आहे.

Galaxy Watch 5 (४० मिमी) ब्लूटूथ-ओनली मॉडलची किंमत २७,९९९ रुपये आहे. याच्याच LTE व्हर्जन ३२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Galaxy Watch 5 (४० मिमी) ब्लूटूथ-ओनली व्हर्जनची किंमत ३०,९९९ रुपये आहे. याच्याच LTE व्हर्जनची किंमत ३५,९९९ रुपये आहे. Galaxy Watch 5 Pro (४५ मिमी) ब्लूटूथ-ओनली व्हर्जन तुम्हाला ४४,९९९ रुपयांना उपलब्ध असेल, तर याचं LTE व्हर्जन तुम्हाला ४९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

हे ही वाचा :-

मोहित कंबोज यांच्या सूचक ट्वीटवर, राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

जन्माष्टमी साजरी करण्यसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त, ‘या’ वेळेत करा पूजा

Latest Posts

Don't Miss