मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर (sachin pilgaonkar) यांना ओळखले जाते. मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून सचिन पिळगावकर यांची गणना केली जाते. सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अशी ओळख असलेले सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस आहे. विशेष म्हणजे सचिन यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (supriya pilgaonkar) यांचाही आज वाढदिवस असतो. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या जोडीची प्रेमकथाही अशीच खास आहे. एका मराठी चित्रपटाच्या सेटवर या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.
अभिनेते सचिन पिळगावकर हे नेहमीच सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतात. सचिन पिळगावकर हे नेहमी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो आणो व्हिडिओ शेअर करत असतात. आणि नुकतंच सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांच्यासह एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या या फोटोला अनेक चाहत्यांनी कंमेंट्स देऊन दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. इन्स्टाग्रामवर सुप्रियासोबतचे काही काही खास फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करताना सचिन पिळगावकर म्हणाले, “माझ्या अर्धांगिंनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुपर. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे सुप्रिया पिळगावकर.” विशेष म्हणजे सुप्रिया पिळगावकर यांनीही त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत उत्तर दिले आहे. “खूप खूप धन्यवाद”, असे त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
लहानपणापासून सचिन पिळगावकर यांना अभिनय क्षेत्रात यायचे होते. सचिन यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ‘हा माझा मार्ग एकला’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ते बालकलाकाराच्या भूमिकेत सचिन पिळगांवकर झळकले होते. यानंतर त्यांनी ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘नदियों के पार’ अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पडली. दरम्यान, ते मराठी चित्रपट सृष्टीदेखील गाजवत होते. त्यांनी ‘माय बाप’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले.
अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा प्रचंड गाजला. या चित्रपटात त्यांनी सुप्रिया यांना मुख्य भूमिकेसाठी निवडले होते. त्यावेळी सुप्रिया या नवोदित अभिनेत्री होती. मात्र, या चित्रपटातून त्या घराघरांत पोहोचल्या. या चित्रपटाच्या सेटवरच सचिन यांना सुप्रिया आवडू लागल्या होत्या. मराठीतील अत्यंत लोकप्रिय जोडी अशी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांची ओळख आहे. या जोडीने मराठी पडदा गाजवला आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले.
हे ही वाचा :-
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरु, राष्ट्रपतीचे अभिनंदनाचा प्रस्ताव