spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सरकारच्या शिष्ठमंडळासोबत संभाजी भिडेही मनोज जरांगेंच्या भेटीला 

मराठा आरक्षण मागणीसाठी मागील १५ दिवसांपासून जालन्यातील आंतरवली सराटी गावात आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरंगे यांच्या भेटीला सरकारी शिष्ठमंडळ आज (मंगळवार) पुन्हा आले आहे.

मराठा आरक्षण मागणीसाठी मागील १५ दिवसांपासून जालन्यातील आंतरवली सराटी गावात आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरंगे यांच्या भेटीला सरकारी शिष्ठमंडळ आज (मंगळवार) पुन्हा आले आहे. सत्तारूढ पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी जरांगेंची भेट घेऊनही मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही तोडगा निघत नसल्याने मनोज जरांगे पाटलांनी कालपासून त्यांचे उपोषण आणखी तीव्र करत सलाईन आणि पाण्याचाही त्याग केला आहे, त्यामुळे आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे हे देखील आज सरकारी शिष्ठमंडळासोबत जालन्यातील उपोषणस्थळी पोहोचले असून त्यांनी उपोषण थांबवा, लढा थांबवू नका असे आवाहन आंदोलनकर्त्याना केले आहे तसेच ‘फडणवीस मराठा समाजासोबत बेईमानी करणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारी शिष्ठमंडळासोबत उपोषणस्थळी दाखल झाल्यानंतर संभाजी भिडे यांनी काही वेळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली तसेच आता उपोषण मागे घेऊन मराठा आरक्षणासंदर्भातील पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवावी असेही आवाहन त्यांनी जरांगे पाटलांना केले. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत सर्व समाजाप्रमाणे आम्हीही मनोज जरांगे यांच्या सोबत असून जरांगेंच्या पाठीमागे लाखो लोकांची मोठी ताकद असल्याने सरकार हा विषय गंभीरतेने हाताळेन आणि मराठा समाजाला निश्चितपणाने कायद्याच्या चौकटीत कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२९ सप्टेंबर रोजी जालन्यातील आंतरवली सराटी येथे शांततेत सुरु झालेले मराठा आरक्षण आंदोलन २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे चिघळले होते. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद पाहायला मिळाले होते. यानंतर खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील चर्चेत आले तसेच मराठा आरक्षण मागणीला बळ मिळाले. या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आणि जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जागोजागी शांततामय मार्गाने आंदोलने सुरु झाले. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. मनोज जरांगेशी चर्चेतून कुठलाही तोडगा निघत नसल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणसंदर्भात एक जीआर काढला होता यामध्ये निजामकालीन कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याबद्दल शिंदे सरकारने हालचाली वाढविल्या होत्या मात्र यानंतर जरंगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याबद्दल आग्रह धरला व यंत्रे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली. आता दुसऱ्यांदा सरकारी शिष्ठमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आल्याने शिष्ठमंडळाला मनोज जरांगेंची मनधरणी करण्यात यश येतंय का? हे आता महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा: 

मनोज जरांगेंनी मांडली स्पष्ट भूमिका

कोकणातील बारसू प्रकल्पाला येणार वेग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss