spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठी लिटिल चॅम्प्सच्या सेटवर अशोक मामा झाले भावुक…

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशोक सराफ यांनी अनेक मराठी (Marathi) आणि हिंदी चित्रपटांमध्ये (Hindi movies) काम केले आहे.

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. अशोक सराफ यांनी अनेक मराठी (Marathi) आणि हिंदी चित्रपटांमध्ये (Hindi movies) काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर अशोक मामांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ भावूक (Emotional) झालेले दिसत आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ (Saregamp Little Champs) या कार्यक्रमामधील अशोक सराफ यांचा व्हिडीओ अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामधील स्पर्धक हे अशोक मामांचा आशीर्वाद घेत आहेत. एका स्पर्धकाने अशोक मामांचे पाय दुधाने धुतले. तर दुसऱ्या स्पर्धकानं अशोक मामांचा पाय पुसून घेतला. व्हिडीओमध्ये ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील स्पर्धकांना आशीर्वाद दिल्यानंतर अशोक मामा भावूक झालेले दिसत आहेत.

निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला हा अशोक मामांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स (likes) आणि कमेंट्सचा (comments) वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘थोर माणूस आणि अभिनेता’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘माहित नाही या व्यक्तीमध्ये काय जादू आहे. यांना पाहिल्यानंतर चेहऱ्यावर स्मित हास्य येते.’

अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केलं आहे. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अशोक सराफ यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.’मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी १९९० मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. निवेदिता सराफ आणि अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीमधील लाडकी जोडी (Lovely couple) म्हणून ओळखले जातात.

हे ही वाचा: 

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या संपत्तीबाबत गौप्यस्फोट

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी यांनी दिली एक मोठी अपडेट…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss