spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काय म्हणाले एकनाथ शिंदे त्या व्हिडीओमध्ये

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे. त्यामुळे जे काही विघ्नसंतोषी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या संभाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे यांनी गेले १५ दिवस उपोषण केले आहे. मात्र अजून देखील ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांची भेट न घेण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळाशी चर्चा सुरु आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे जरांगे पाटील यांची भेट न घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आंदोलन स्थळी यावे अशी अट घातली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटीबद्ध आहे. त्यामुळे जे काही विघ्नसंतोषी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना बळी पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या संभाषणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.आंदोलन आणि आरक्षण याबाबत सरकार गंभीर आहे. सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर आम्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेला येत असताना आम्ही बोलत बोलत येत होतो. प्रॅक्टिकल चर्चा झाली होती. रात्रभर चर्चा झाली होती. तिघांनी ठरवलं होतं की, उपोषणावर बोलू त्या व्यतरिक्त राजकीय काहीही वक्तव्य करायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण, काहींनी व्हिडिओचा भाग कट करुन सादर केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय कोणतीही राजकीय विषयाची चर्चा नको असं आम्ही ठरवलं होतं. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा अर्थ काढून आणि चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सादर करण्यात आला. नेमका काही भाग काढून संभ्रम निर्माण होईल असा व्हिडिओ समोर आणला. सरकार आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर नाही हे दाखवण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिंदेंनी केली.

हे ही वाचा: 

रद्द केलेले कृषी कायदे मोदी सरकार परत आणणार ?

Ganesh Chaturthi 2023, लाडक्या गणपती बाप्पाबाबत ‘या’ पाच कथा आणि त्यांचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss