spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तोंडाने पेढा भरवत उदयनराजेंनी केला कार्यकर्त्याचा बर्थडे साजरा

या वेळी कार्यकर्ते विनोद मोरे यांचे कौतुक करताना उदयनराजे यांनी त्यांना तोंडाने पेढा भरवला

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील गोडोली येथे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांला अनोख्या पद्धतीने पेढा भरवल्याची जोरदार चर्चा साताऱ्यात आहे.

नगरपालिका निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना साताऱ्यातील दोन्ही राजे हजेरी लावताना पहायला मिळत आहे. साताऱ्यातील अशाच एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली आणि तोंडाने पेढा भरवून त्यांच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या.गोडोली (सातारा)येथील त्यांचे कार्यकर्ते विनोद मोरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांच्या परिसरात जाऊनत्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला आणि या वेळी कार्यकर्ते विनोद मोरे यांचे कौतुक करताना उदयनराजे यांनी त्यांना तोंडाने पेढा भरवला. उदयनराजेंची लोकप्रियता कार्यकर्त्यांमध्ये खूप आहे.कार्यकर्त्यांसोबत त्यांचं दुचाकीवरून फिरणे,कॉलर उडविणे,कार्यकर्त्याच्या वाढदिवशी त्याची पप्पी घेणे अशा अनेक दिलखुश अदांवर कार्यकर्ते खुश असतात आणि सध्या आपल्या कार्यकर्त्यांचं एका अनोख्या अंदाजात कौतुक करतानाच विडिओ त्यां समाज माध्यमावर चांगलाच प्रसारीत होत आहे.

खासदार उदयनराजे सातारा शहरातील गोडोली येथील कार्यकर्ते विनोद मोरे यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिले,त्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याला आपल्या अनोख्या पद्धतीने पेढा भरवत त्याचे कौतुक करत वाढदिवस साजरा केला. हा व्हिडीओ समाज माध्यमावर जोरदार फिरत आहे.त्याची सताऱ्यातही जोरदार चर्चा आहे.

हे ही वाचा:

एलोन मस्कचे मँचेस्टर युनायटेड विकत घेत असल्याचे ट्विट झाले व्हायरल

Latest Posts

Don't Miss