spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘दगडीचाळ २’ मध्ये आता ‘शकील’ची एंट्री

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ (Dagadichal 2) हा चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीस येणार आहे.

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ (Dagadichal 2) हा चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीस येणार आहे. अभिनेते मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘दगडी चाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील चांगलाच प्रतिसाद दर्शवला होता. त्यानंतर आता लवकरच ‘दगडी चाळ’ चा भाग दोन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या आगामी चित्रपटाची सोशल मीडियावर देखील तुफान चर्चा हि सुरु झाली आहे.

नुकताच ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ‘सूर्या’ ,’डॅडी’ ,’सोनल’ यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे ‘शकील’ आहे. ‘सूर्या’ आणि ‘डॅडी’ या दोघांच्या वादात आता ‘शकील’ कहाणीला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. ‘शकील’ने केलेल्या कमाल एन्ट्रीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

‘डॅडी’ ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे. याचे उत्तर येत्या १९ ऑगस्टला चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी सूर्याच्या, पूजा सावंत सोनलच्या, मकरंद देशपांडे डॅडींच्या भूमिकेत असून शकीलच्या भूमिकेत अभिनेता अशोक समर्थ दिसणार आहेत. दहशद, गॅंगवॉर, राजकारण, ऍक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा ‘दगडीचाळ २’ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

हे ही वाचा :-

अजित पवारांना दिलेली क्लिनचीट अद्याप प्रलंबित ?

तोंडाने पेढा भरवत उदयनराजेंनी केला कार्यकर्त्याचा बर्थडे साजरा

Latest Posts

Don't Miss