Friday, September 27, 2024

Latest Posts

मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर मनसेची फक्त कारवाई नाहीतर कडक कायदा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम मराठी लोकांच्या पाठीशी असतात. यावरच मुलूंड  प्रकारानंतर मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी गंभीर आरोप केले आहेत संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे कि कॉग्रेस आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांमुळे मुंबईत अशा जैन आणि गुजराती सहकारी गृहनिर्माण संस्था तयार झाल्या आहेत. त्यात मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर खपवून घेतल जाणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. तसेच मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी करणारे पत्र देखील मनसेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती संदिप देशपांडे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात असं पुन्हा घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

काय आहे मागणी?

संदीप देशपांडे म्हणाले, जे लोक भाषेच्या ,धर्माच्या, जातीच्या आणि खापिण्याण्याच्या बाबतीत भेदभाव करून जागा नाकरत असतील तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. खरंतर या जैन गुजराती सोसायटी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप यांच्यामुळे तयार झाल्या आहेत. जेणेकरून त्यांना एकत्रित मत या सोसायटी मधून मिळतील. आता ज्याप्रकारे मराठी माणसाला तिथे जागा किंवा घर नाकारले जाते हे चुकीच आहे.

२०१६ मध्ये मुंबई महापालिकेने जे लोक भाषेच्या धर्माच्या जातीच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करतात त्यांच्या विरोधात एक प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये अशा ठिकाणच्या इमारतीला ओसी रद्द करण्यात यावा. यानंतर प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. धर्म, जात, खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे अशा प्रकारचे प्रकार कुठल्या सोसायटीमध्ये घडले तर त्या ठिकाणी त्या सोसायटीचा डी रजिस्ट्रेशन करून तिथे प्रशासक नेमावा. तसेच विकासकांना सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये.

हे ही वाचा: 

परिणीतीने राघव चड्ढाला दिल लग्नाचं खास गिफ्ट …

देशात नेमकं काय चालू आहे? बंगालमध्ये महिलेसोबतच्या क्रूरतेच्या ओलांडल्या सर्व मर्यादा, आधी गळा कापला अन्…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss