गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आगामी दसरा मेळाव्यासाठी एक महिना अगोदरच मुंबई महानगरपालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी अर्ज करे गटाकडून सावध भूमिका घेत एक महिन्यापूर्वीच शिवाजी पार्क मैनासाठी दावेदारी निश्चित केली आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्याला मैदान देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. त्यानंतर न्यायालयाने बीएमसीला दिलेल्या दणक्यानंतर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला होता.
गेल्यावर्षी शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी सावध पावले उचलण्यात आली आहेत. ठाकरे गटाने अर्ज करताना या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे ठाकरे गटाचं वैभव राहिलं आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येत असतात. मात्र गेल्यावर्षी शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीने दोन गट झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी दोन मेळावे झाले होते. एकनाथ शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात मेळावा घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
परिणीतीने राघव चड्ढाला दिल लग्नाचं खास गिफ्ट …
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.