Friday, September 27, 2024

Latest Posts

राज्यात आतापर्यंत सरासरी ९६ टक्के पावसाची नोंद

राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागात अजूनही हवातसा पाऊस पडला नाही.

राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागात अजूनही हवातसा पाऊस पडला नाही. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १ जून पासून देशात सरासरी ९४ टक्के एवढा पाऊस पडला आहे. तर राज्यात ९६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागच्या आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. केरळसह (Kerala) महाराष्ट्रात (Maharashtra) पाऊस कमी प्रमाणात असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. काही जिह्ल्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील कोकणात समाधानकारक पाऊस पडला आहे.यावर्षी कोकणात सरासरी ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र्रात ८७ टक्के, तर मराठवाड्यात ८७ टक्के, आणि विदर्भात ९७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या आठवड्यापासून राज्यातील परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसात देशाच्या पश्चिम-मध्य भागातून मान्सून परतण्यास सुरूवात होईल. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये खूप कमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून पासून सरासरी ५६ टक्के पाऊस पडला आहे. तर ४४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. बीडमध्ये सरासरीच्या ७७ टक्के पावसाची नोंद, संभाजीनगरात ८७ टक्के, धाराशिवमध्ये सरासरीच्या ७१ टक्के पावसाची नोंद, जालन्यात सरासरीच्या फक्त ६७ टक्के पाऊस, हिंगोलीत सरासरीच्या ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अकोल्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तर अमरावती जिल्ह्यात ७३ टक्के पावसाची नोंद झाली. राज्यभरात काही भागात कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. काही भागात पाऊस न पडल्यामुळे शेतातील पीक कोमेजून गेली आहेत.

राज्यभरात आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरले आहेत. वायव्य आणि लगतच्या पश्चिम भारतातील आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी निर्माण होत आहे. पूर्व भारतामध्ये २९ सप्टेंबर पासून मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आले होता. यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाला १७ सप्टेंबर सुरुवात होणार होती. त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असणार आहे.

हे ही वाचा: 

आज रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर ३८ तासांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

आजचे राशिभविष्य,३०सप्टेंबर २०२3,आज अती उत्साहात आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss