Friday, September 27, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केले जनतेला आवाहन

महात्मा गांधीं यांच्या जयंतीचे औचित्य साधून, केंद्र सरकारने एक मोहीम राबवली आहे. ' स्वच्छता हीच सेवा ' अशी मोहीम राबवण्यात आली आहे.

महात्मा गांधीं यांच्या जयंतीचे औचित्य साधून, केंद्र सरकारने एक मोहीम राबवली आहे. ‘ स्वच्छता हीच सेवा ‘ अशी मोहीम राबवण्यात आली आहे. देशभरातील सर्वच नागरिकांना स्वच्छता हीच सेवा या मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) स्वच्छता केली.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवडी किल्ल्यावर (Sewri Fort) तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये (Baramati) स्वच्छता सेवा अभियानात सहभाग घेतला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अहमदाबादमध्ये स्वच्छता केली. स्वच्छता हीच सेवा मोहीमेंतर्गत राज्यात ‘एक तारीख एक तास’ मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ७२ हजार पेक्षा जास्त ठिकाणी स्वछता मोहीम राबवण्यात आली आहे.

आज मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सुंदर महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीने, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वत: हातात झाडू घेऊन श्रमदान केले आहे. स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनवण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोक चळवळ झाली आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर नागरिकांच्या श्रमदानानं स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी येथे शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव केएच गोविंद राज, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल श्री कोबी, कोस्टगार्ड महासंचालक कैलाश नेगी,अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुबोध भावे हे सेलिब्रिटीही उपस्थित होते.

स्वच्छता हीच सेवा हे अभियान महत्त्वाचं आहे. ते कागदावर ठेवू नका. प्रत्यक्ष फिल्डवर काम दिसलं पाहिजे. आजचा दिवस झाला की संपलं, असं नाही. आज स्वच्छता आणि उद्या कचरा, असं होता कामा नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छतेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केलं आहे.

या मोहिमेत सर्वानी घेतलेल्या सहभागाचे मुख्यमंत्री यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा केली आणि स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आणि खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि जो इतिहास त्यानंतर रचला तो सगळ्या जगानं पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानंच राबविण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे.

Latest Posts

Don't Miss