Friday, September 27, 2024

Latest Posts

प्रकाश आंबेडकर यांनी केली शरद पवार गटावर टीका

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात मैत्री पूर्ण सबंध आहेत. पण या मैत्रीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोड घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात मैत्री पूर्ण सबंध आहेत. पण या मैत्रीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस खोड घालत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी अनेक रुपकं वापरत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली आहे. ठाकरे आणि आमचा साखरपुडा झालाय. मात्र, लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरुपी दोन भटजीच अडथळे आणत आहात असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीय अस्पृष्यता पाळतात. आता मी एकाएकाची पोलखोल करणार आहे. मी आतापर्यंत कुटुंबामुळं शांत होतो. कुटूंबातील मुलं मोठी झालीत, त्यामुळं आता काही लोकांबद्दल बोलणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. वेळप्रसंगी बिना लग्नाचं राहू, परंतू, दुसरं स्थळ पाहणार नसल्याचं सांगत त्यांनी इतर दुसऱ्या पक्षांशी आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच दुसरा मार्गच नसल्यानं स्वबळावर लोकसभेच्या 48 जागांची तयारी सुरू केली आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही नाराज पक्षांशी स्वत:हून संपर्क साधणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे . महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी यांना कुणाशी लढायचं यावरुन संभ्रम आहे. यांच्यापैकी कुणाशीच आघाडीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभेसाठी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेचे प्रकाश आंबेडकरांनी खंडन केलं आहे. दरम्यान, सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा आणि विधानसभेची कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा: 

बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे तेलंगणात कनेक्शन

PMPML बसमध्ये आता UPI पेमेंट सेवा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss