Friday, September 27, 2024

Latest Posts

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘ श्यामची आई ‘ चित्रपट

लहानपणी प्रत्येकाने साने गुरुजींची श्यामची आई ही कादंबरी वाचलीच असेल.

लहानपणी प्रत्येकाने साने गुरुजींची श्यामची आई ही कादंबरी वाचलीच असेल. आणि अजूनदेखील लक्षात असेलच. आई आणि मुलामधील निस्सीम प्रेमाची जाणीव करून देणारी कादंबरी कोण कसे विसरेल? म्हणूनच मग ही कादंबरी आवडणाऱ्या प्रत्येकासाठी व सिनेप्रेमींसाठी मराठी सृष्टी ‘ श्यामची आई ‘ हा चित्रपट घेऊन येत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार असून सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. श्यामची आई या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.

सुप्रसिद्ध स्टारकास्ट :
चित्रपटामध्ये साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका ओम भुतकर ने साकारली आहे. तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर, अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

‘श्यामची आई’ बद्दल :
आई मुलांमधील जिव्हाळ्याचं नातं दाखवणारा हा चित्रपट लवकरच दिवाळीला रिलीज होणार आहे. अभिनेत्री गौरी देशपांडे हिने सोशल मीडिया वर सिनेमाच पोस्टर देखील शेअर केलं आहे. साने गुरुजी लिखित, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी, आई आणि मुलाच्या दृढ नात्याची आणि निस्सीम प्रेमाची गोष्ट ‘श्यामची आई’. या दिवळीत महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांत. असा पोस्ट खाली तिने लिहलेलं आहे. श्यामचं आईबद्दलचं प्रेम, भक्ती, कृतज्ञता या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहलेल्या ‘श्यामची आई ‘ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असेल. कृष्णधवल पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

हे ही वाचा: 

बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे तेलंगणात कनेक्शन

राज ठाकरें यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss