spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रात घातपातीचा प्रयत्न ? रायगड मधील श्रीवर्धनच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटीत शस्त्रे आढळून आले

आज सकाळच्या सुमासार रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे समुद्रात संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीत कोणी मनुष्य दिसले नाहीत त्यामुळे हि बोट वेवारास असल्यचे म्हटले जात आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 रायफल आढळले आहेत. त्याच बरोबर कागद पत्र देखील यात आढळली आहेत. याची माहित रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे यांनी देखील माहिती दिली.

त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने  पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हि बोट ओमानमधून रायगड मधून भरकट आली आहे. याबाबत पोलिसांनी हि प्राथमिक माहित दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही घातपात करण्याचा प्रयत्न नसल्यचे सागितले आहे. परंतु पोलिसांनी अलर्ट राहण्याचे सांगितले, आणि पाश्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदीत लावण्यात आली आहे.

स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना काही संशयास्पद बोटी किनाऱ्यावर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. त्यापैकी दोन बोटी आज श्रीवर्धन येथे आढळून आल्यात.

भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

पुढे सण आले आहेत आणि कोकणाकडे लाखो गणेश भक्त हे कोकणामध्ये जातात आणि यावेळेस हि बोट सापडणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. परंतु यावर आता पोलीस त्याची चौकशी करेल. हि बोट कोणी आणली कशी आणली, त्याच्यात जी हत्यार सापडली आहेत, याचे नक्की काय कारण आहे या सर्वच तपास करावा लागेल. अशी माहिती भारत गोगावले यांनी दिली आहे.

अनिकेत तटकरी यांची प्रतिक्रिया

आज सकाळी जी बोट सापडली त्यात ३ एके ४७ आणि २४७ राऊंड सापडले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता पोलीस अधिक तपस याबाबत करत आहेत. ओमान वरून ती बोट वाहत वाहत इथं पर्यंत आली आहे. नेपच्युन सिक्युरिटी सर्विस यांची ती बोट आहे असा सर्व प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या सर्व प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. असे अनिकेत तटकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्व नागरिकांना अनिकेत तटकरी यानियानी विनंती देखील केली आहे कि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असल्याची बोट सापडली आहे. काही लाईफ जॅकेट्सही या परिसरात सापडले आहेत. माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, या घटनेचा तातडीनं सर्व यंत्रणांच्या मार्फत तपास व्हायला हवा. त्याचबरोबर अशाच पद्धतीची घातक शस्त्रे आपल्या किनारपट्टीवर येऊ नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना यापूर्वी केल्या होत्या, काही यंत्रणा उभी केली होती. त्यांचं यामध्ये अपयश आहे का? याची चौकशी करण्यात यावी. कारण या बोटी भरकटून किनारपट्टीवर आली की काय हे देखील तपासातून पुढे येईल. रायगडच्या जनतेनं विचलीत होऊ नये, अशी विनंती त्यांना करतो. चोवीस तासात याबाबतीतलं सत्य जनतेसमोर येणं आवश्यक आहे. राज्य सरकारच्या दहशतवादविरोधी पथकानं या घटनेची सूत्र तातडीनं हातात घेणं गरजेचं आहे. कारण ही सर्व रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी सगळे सुरक्षेच्या यंत्रणांनी हा तपास करणं गरजेचं आहे, असेही पुढे सुनील तटकरे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss