Friday, September 27, 2024

Latest Posts

नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाइटमुळे तरुणांच्या डोळ्यांत उतरले रक्त

राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूका मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडल्या. तब्बल पाच वर्षानंतर डिजेबंदी हटवल्यानंतर सगळीकडे विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आले होते.

राज्यभरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूका मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडल्या. तब्बल पाच वर्षानंतर डिजेबंदी हटवल्यानंतर सगळीकडे विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आले होते. तसेच डीजे (DJ) आणि लेझर शोच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. मात्र काही तासानंतर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यामध्ये जवळपास सहा रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच अनेक तरुणांची नजर अचानक कमी झाल्याचे दिसून आले आहे. विसर्जन मिरवणुकीतील (Ganesh Visarjan) लेझर लाइटमुळे हा त्रास झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ६ घटना समोर आल्या आहेत. लेझर लाइट्समुळे रुग्णांच्या नेत्रपटलावर भाजल्या सारख्या जखमा झाल्या आहेत. या जखमा झाल्यामुळे डोळ्यात रक्त उतरले आहे. भर उन्हात भिंगासमोर कागद जसा जळतो तसाच हा प्रकार असल्याचं डॉक्टर सांगतात. काहीवेळा या लाइटमुळे दृष्टी जाण्याची शक्यता असते. घातक लेझरमुळे दृष्टी कायमस्वरूपी देखील जाऊ शकते अशी भिती नाशिक नेत्ररोग तज्ञ असोसिएशनने व्यक्त केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती देखिल सुरु केली आहे. सरकारने अश्या घातक लेझर लाइटवर बंदी आणायला हवी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. युवक त्या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले. त्यांच्याबाबतच हा प्रकार घडला आहे.

नाशिक मध्ये काही रुग्णांमध्ये डोळ्यासंबंधीत काही घातक लक्षण दिसून आली आहेत. विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर काहींना दिसायचे कमी झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर निदर्शनास आले की डोळ्याचा अंतर्गत पडदा म्हणजे रॅटीना असतो, त्या भागात गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाली आहे. एखाद्या प्रखर उजेडामुळे किंवा उन्हामुळे जळणं होत असतं. त्याच प्रकारे त्यांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे काही रुग्णांची नजर कमी झाली आहे. लेझर शोध जरी बंद झाले असले तरी काही ठिकाणी लेझर द्वारे आकृती तयार केली जाते. आता या लेझर लाईटवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss