Thursday, September 26, 2024

Latest Posts

हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी चोवीस तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला.

नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सोमवारी चोवीस तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी पुन्हा ७ रुग्ण दगावले. या घटेनमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीन याना स्वच्छतागृह साफ करायला लावला. त्यानंतर आता हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या प्रकारावरून गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झाले आहे. हेमंत पाटील यांनी माफ मागावी अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे. खासदार हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार, अशी भूमिका सेंट्र्ल मार्डनं घेतली आहे.

घडलेल्या या घटनेमुळे राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रया मांडल्या आहेत. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. रुग्णालयाच्या अनास्थेपोटी असं कृत्य केल्याची प्रतिक्रिया हेमंत पाटलांनी दिली आहे. पुढे हेमंत पाटील म्हणाले ‘ रुग्णालयात २६० कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. ३६ रुग्ण दगावल्यानंतर सुद्धा अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केले आहे आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे असे हेमंत पाटील म्हणाले.

Latest Posts

Don't Miss