Wednesday, September 25, 2024

Latest Posts

सिमेंटच्या किमतीमध्ये मोठी वाढ, वाढलेल्या किमती?

दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अन्न धान्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर आता सिमेंटच्या (Cement) दरात देखील मोठी वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अन्न धान्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर आता सिमेंटच्या (Cement) दरात देखील मोठी वाढ झाली आहे. मागील तिने महिन्यांपासून सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घर बांधणीच्या घराचात वाढ झाली आहे. तसेच सिमेंटच्या दरात झालेली ही वाढ येत्या काळात कमी होणार नसल्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्यात सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घर बांधणीचा खर्च देखील वाढला आहे. तसेच येत्या काही दिवसांत ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात सिमेंटच्या किमतींमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल-जून २०२३ च्या सरासरी किमतीपेक्षा ०. ५ टक्के ते १ टक्क्यांनी वाढ जास्त आहेत. सिमेंटच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे मुख्य कारण म्हणजे पूर्व भारतातील सिमेंटच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सिमेंट कंपन्यांनी आपले दर वाढवले आहे. सप्टेंबरच्या अखेरीस सिमेंटची एक पिशवी ५० ते ५५ रुपये एवढी आहे.तसेच येत्या काळात यामध्ये २० रुपयाने वाढ होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी सिमेंटच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली होती. तसेच दीर्घकालीन किमती अजूनही कमी होणार आहेत. जुलै महिन्यात स्वस्त झालेले सिमेंट मागील दोन महिन्यांपासून वाढले आहे. त्यात आता पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही काळात सिमेंटची किंमत कमी होणार नसून ती वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी निवडणुकांपूर्वी सरकारी खर्चावर भर दिल्यामुळं या क्षेत्रातील मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. या किमतींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss