Wednesday, September 25, 2024

Latest Posts

‘Karna’च्या माध्यमातून गाजवणार हिंदी मनोरंजनसृष्टी!, Suriya चं बॉलिवूडमध्ये पदार्पण

दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या (Suriya) सध्या त्याच्या आगामी 'कंगुवा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तामिळ सुपरस्टार सूर्याच्या या सिनेमांचं दिग्दर्शन शिवा करत आहे

दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या (Suriya) सध्या त्याच्या आगामी ‘कंगुवा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. तामिळ सुपरस्टार सूर्याच्या या सिनेमांचं दिग्दर्शन शिवा करत आहे. सूर्याचा हा पहिलाच पॅन इंडिया सिनेमा आहे. आता ‘कर्ण’ (Karna) या सिनेमीच्या माध्यमातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड गाजवण्यासाठी सूर्या आता सज्ज आहे. ‘कर्ण’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक पौराणिक कथा पाहायला मिळणार आहे. ‘कर्ण’ हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘कर्ण’ या सिनेमात सूर्या कर्णच्या भूमिकेत दिसणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. ५०० कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील वर्षात अर्थात २०२४ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. ‘वादी वासाल’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सूर्या ‘कर्ण’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधा कोंगरा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

‘जय भीम’ स्टार सूर्या लवकरच ‘रंग दे बसंती’ फेम दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहराच्या आगामी सिनेमात सूर्या दिसणार आहे. सूर्याच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड सिनेमाचं नाव ‘कर्ण’ आहे. कर्णच्या पात्राभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. अद्याप या सिनेमाची स्टारकास्ट समोर आलेली नाही. सूर्याच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘कर्ण’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सूर्याच्या चाहत्यांसह सिनेप्रेमी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सूर्याचा ‘कंगुवा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासह तो ‘वादी वासाल’ आणि ‘कर्ण’ या सिनेमात झळकणार आहे. तसेच अक्षय कुमारच्या ‘सोराराई पोट्टरू’च्या रिमेकमध्येही तो दिसणार आहे. या सिनेमात त्याची झळक दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सूर्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली आहे. आता बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी तो सज्ज आहे.

हे ही वाचा: 

‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा, ‘शॅार्ट ॲन्ड स्वीट’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित

राष्ट्रपती राजवटीवरून शरद पवारांवर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss