Wednesday, September 25, 2024

Latest Posts

उपमुखमंत्री अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जेष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार आहे. शहरातील मुस्लिम समाज पानसरे यांच्या पाठिशी आहे. पानसरे यांनी पवार यांना समर्थन दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याच म्हंटल जात आहे. पानसरे यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आहे. यात त्यांनी शहरातील राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला शरद पवार यांच्याशी पर्याय नसल्याचे पानसरे यांनी म्हटले आहे. शहराध्यक्ष तुषार कामठे यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीचाही अनुभव आहे. पिंपरी मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. पानसरे ज्यांना साथ देतात, तो पिंपरीचा आमदार होतो हे मागील तीन निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटात गेलेले आमदार अण्णा बनसोडे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पक्षातील फुटीनंतर आझमीभाई पानसरे यांची भूमिका समोर आली नव्हती. आता त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे. आझम पानसरे हे शहरातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी शहराचे महापौरपद भूषविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटाने पिंपरी-चिंचवडवर लक्ष केंद्रित केले आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, दोन नगरसेवक वगळता सर्व माजी नगरसेवक, शहर कार्यकारीणीने अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. शहराची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. रोहित यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे शहरातील दौरे वाढले आहेत. उद्या पुन्हा पाटील शहरात येणार असल्याची माहिती आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss