spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन म्हणजे काय?

18 ऑगस्ट रोजी जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन म्हणजेच World Breast Cancer Research day साजरा केला जातो.

18 ऑगस्ट रोजी जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन म्हणजेच World Breast Cancer Research day साजरा केला जातो. ब्रेस्ट कॅन्सर हा एक गुंतागुंतीचा आजार आहे, या रोगामुळे रुग्णांना शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच या रोगाशी लढून आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करावी लागते. तर आज  आपण या World Breast Cancer Research day का साजरा केला जातो याबद्दल जाणून घेणार आहोत.

स्तनाच्या कर्करोगाच्या चिन्हांची पहिली नोंद 3000 ईसापूर्व काळी झाली, आणि त्याकाळी या रोगाच्या निदानासाठी प्राचीन ग्रीसमध्ये लोकांनी स्तनाच्या आकाराच्या भांड्यातून औषधाची देवता, अस्क्लेपियस ला औषध अर्पण केले होते.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका समजून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण इतिहासात बरेच प्रयोग झाले आहेत. प्राचीन काळापासून आतापर्यंत ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी अनेक प्रयोग केले गेले आहेत. परंतु 1970 च्या दशकापासून स्तनाच्या कर्करोगाचे संशोधन आणि स्तनाच्या कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी होत गेले आहेत, परिणामी या आजाराचे सकारात्मक निदान झाले आहे आणि मृत्यूचे प्रमाण देखील बरेच कमी झाले आहे.

1960 च्या दशकापासून, स्तनाच्या कर्करोगाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता मोहीम राबवली गेली आहे आणि या सातत्यपूर्ण आणि मजबूत संदेशाचा परिणाम म्हणून आता जगभरात स्त्री आणि पुरुष दोघांनाही नियमित आरोग्य स्क्रिनिंगचे महत्त्व समजले आहे.

त्यानंतर मे 2021 मध्ये, डॉ. सुसान लव्ह फाऊंडेशनने अधिकृतपणे 18 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन म्हणून घोषित केला, केवळ या आजाराकडेच लक्ष वेधण्यासाठी नाही तर या आजारावर परिणाम करणाऱ्या, या आजाराला समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी किती मेहनत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश या दिवसाचा आहे.

डॉ. सुसान लव्ह फाउंडेशने हा दिवस घोषित करताना एक दिवस जागतिक स्तन कर्करोग संशोधन दिन हा इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरेल आणि त्यादिवशी स्तनाच्या कर्करोगापासून जग मुक्त होईल अशी आशा व्यक्त केली होती.

हे ही वाचा:

श्रीकृष्ण जन्माष्टमीला रात्री १२ वाजता उघडणार रामजन्मभूमीचे दरवाजे

Latest Posts

Don't Miss