spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘टायगर 3’ मधला सलमान खानचा जबरदस्त लूक

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा दमदार लूक पाहायला मिळतोय

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (salman khan)’टायगर 3′ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत  चित्रपट ‘टायगर 3’ बऱ्याच दिवसांपासून खुप चर्चेत आहे. दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये सलमान खानचा कडक लूक पाहायला मिळतोय.सलमन

सलमानने सोशल मीडियावर चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये टायगरची भेदक नजर,  हातात बंदूक दिसत आहे. यासोबतच त्यांच्या मागे पोलिसांची अनेक वाहनेही दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘टायगर आ रहा है, रेडी हो जाओ’.

याआधी सलमानने कतरिनाचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये ती हातात बंदूक घेऊन गोळ्या झाडताना दिसत आहे.  पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढली आहे. पुन्हा एकदा टायगर आणि झोयाची लव्हस्टोरी आणि अ‍ॅक्शनचा तडका आणि सलमान –झोयाचा रोमांन्स पाहायला मिळणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.  सलमान खानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे.

‘एक था टायगर’ (2012) आणि ‘टायगर जिंदा है’ (2017) बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते.त्यामुळे आता ‘टायगर ३’या चित्रपटासाठी प्रेक्षक अधिक उत्सुक असल्याचं समझत आहे, .’एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने जसा धुमाकूळ घातला तसाचं आता ‘टायगर ३’हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की,दरम्यान सलमान खानचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी सलमानचे चाहते नेहमीच आतुर असतात,त्यामुळे येत्या दिवाळीला सलमानकडून त्याच्या चाहत्यांसाठी खास भेट असणार.

यासोबतच टायगर हा यशराजच्या आधीच्या स्पाय थ्रिलर ‘वॉर’ आणि ‘पठाण’ सारखा पॅन इंडिया चित्रपट असेल अशी माहितीही सलमानने दिली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे, कारण ‘टायगर जिंदा है’च्या अफाट यशानंतर ६ वर्षांनंतर सलमान आणि कतरिना ही जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

हे ही वाचा: 

नवरात्रीमध्ये जर तुमचा उपवास असेल तर घरच्या घरी बनवा भगरीचे धिरडे

समाजात काही चुकीचं दिसलं तर रस्त्यावर उतरा- शरद पवारांचे महिलांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss