spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘पिंक वेनम’सह ब्लॅकपिंक के – पॉप ग्रुपने केले पुनरागमन

ब्लॅकपिंकचे हे गाणे त्यांच्या आगामी 'अल्बम बॉर्न पिंक' ची झलक आहे.

तब्बल दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर जगप्रसिद्ध के-पॉप गर्ल्स ग्रुप ब्लॅकपिंकने आपल्या ‘पिंक वेनोम’ या नव्या गाण्यासह पुनरागमन केले आहे. ब्लॅकपिंकचे हे गाणे त्यांच्या आगामी ‘अल्बम बॉर्न पिंक’ ची झलक आहे. म्युझिक व्हिडिओसह रिलीज झालेल्या या ट्रॅकने आज दुपारी (19 ऑगस्ट) रिलीज झाल्यानंतर दोन तासांपेक्षा कमी कालावधीत YouTube वर 15 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत.

रोलिंग स्टोनच्या मते, म्युझिक व्हिडिओमध्ये, ब्लॅकपिंकचे चार सदस्य – लिसा, जेनी, जिसू आणि रोज – नवीन फॅशन, स्टाइलिंग आणि कोरिओग्राफी तसेच नव्या संकल्पनात्मक सेटसहदिसून येत आहेत.पिंक वेनम हा ब्लॅकपिंकचे लेबल असणारा YG एंटरटेनमेंटने तयार केलेला सर्वात महागडा म्युझिक व्हिडिओ आहे. Twitter वर, #PinkVenom सध्या स्थानिक पातळीवर दोन दशलक्ष ट्विट्ससह पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. तसेच प्रेक्षकांना युट्यूब शॉर्ट्सवर #Pinkvenomchallege मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रीत देखील केले जात आहे. हा ट्रॅक टेडी पार्क, आर. टी, 24 आणि आयडीओ या निर्मात्यांनी बनवला असून यात हिप-हॉप आणि पारंपारिक कोरियन वाद्ये यांचे एकत्रीकरण केले आहे.

पिंक वेनोम इतके वेगळे का आहे?

ब्लॅकपिंक पिंक वेनोम हे गाणे ते त्यांचा एक जबरदस्त कमबॅक म्हणून रिलीज करत आहेत. त्यामुळे या के पॉप ग्रुपने आपल्या या नव्या गाण्यातून एकत्र गात आणि पारंपरिक कोरियन आणि हिप-हॉप चा उत्तम मेळ घालत स्वतःला पुन्हा एकदा एक उत्तम के पॉप ग्रुप म्हणून सिद्ध केले आहे.

शुक्रवारी रात्री (19 ऑगस्ट) BLACKPINK च्या परतीचा उत्सव साजरा करण्यासाठी, जगभरातील प्रसिद्ध ठिकाणं गुलाबी रंगाने उजळले जाणार आहेत. या स्मारकांमध्ये न्यूयॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज, लंडनचा मार्बल आर्क, टोकियो टॉवर आणि सिओल एन. सिओल टॉवर यांचा समावेश असणारं आहे.

इंटरस्कोप रेकॉर्ड्सने LANDMRK नावाच्या प्लॅटफॉर्मसह एक मोबाइल अनुभव तयार केला आहे. ज्यामध्ये BLINKs या – BLACKPINK च्या फॅनबेससाठी डिजिटल कॉंटेटेन्ट अनलॉक केला जाणार आहे. जो इंग्रजी आणि कोरियन भाषेत उपलब्ध असणार आहे. यामध्ये जगभरातून लोक सहभागी होऊ शकतात.

पुढील शनिवार व रविवार (ऑगस्ट 28), BLACKPINK MTV VMAs मध्ये पदार्पण करणार आहेत. ज्यात रॅपर लिसाला तिच्या “लालिसा” या सिंगलसाठी सर्वोत्कृष्ट के-पॉप श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे.

BLACKPINK चा दुसरा अल्बम – आणि 2020 च्या अल्बमचा फॉलो-अप – BORN PINK 16 सप्टेंबरला रिलीज होईल. त्यानंतर एका महिन्यानंतर ग्रुपचा वर्ल्ड टूर सुरू होईल, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी हि वर्डटूर सिओलमध्ये सुरू होईल आणि 2023 च्या मध्यापर्यंत चालेल. ही “के-पॉप गर्ल ग्रुपची सर्वात मोठी वर्ल्ड टूर” आहे असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट पाहायला पसंत करता तर, हा चित्रपट आवर्जून पहा

Latest Posts

Don't Miss