spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दगडी चाळ २ मध्ये ‘डॅडी’ भेटलेच नाही !

दगडी चाळ म्हटल तर ‘डॅडी’ अर्थात अरुण गवळी डोळ्या सर्वांच्या समोर येतात. अरुण गवळी यांच्या जीवनपाटावर आधरित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर ‘दगडी चाळ २’ चित्रपट आज सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रमुख भूमिके असलेला अंकुश चौधरीने पहिल्या भागात जे काम केलं तितके आकर्षित काम या दुसऱ्या भागत वाटले नाही. सूर्या नावाच्या एका सामान्य मुलाचा गुन्हेगारी विश्वातला प्रवास आणि त्याची हटके प्रेमकहाणी पहिल्या चित्रपटात पहायला मिळाली. पण आता, सूर्याच्या आयुष्यात अनेक बदल घडलेले दिसून आले. त्याने चित्रपटाच्या दुसऱ्या भागात गुन्हेगारी विश्वात पुन्हा प्रवेश केल्यामुळे या भागात फार वेगळे काही पाहायला मिळाले नाही.

फोटोग्राफी एक सुंदर कला, जाणून घ्या जागतिक छायाचित्रण दिनाचे महत्त्व

चित्रपटामध्ये अरुण गवळी यांची भूमिका साकारणारे मकरंद देशपांडे यांच्या अभिनयात फार बदल जाणवला नाही. जो दरारा डॅडींचा चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखवण्यात आला तितका या दुसऱ्या भागात प्रकर्षाने जाणवला नाही. फक्त  डायलॉग मध्ये फेरबदल केल्याचे दिसून आले. पहिल्या भागात डॅडींसाठी काम करणारा सूर्या दुसऱ्या भागात डॅडीच्या विरोधात कसा जातो हे यात पहायला मिळाले. चित्रपटात फ्लॅशबॅक इतका चांगला जमून आलेला नाही. हा मराठी चित्रपट पाहताना हिंदी चित्रपटाच्या तुलनेने काही वेगळेपणा जाणवला नाही.

‘चाळ कधीच काही विसरत नाही’, ‘चाल के दरवाजे लोहे के हैं’ या संवादापेक्षा मागील भागातील संवाद आकर्षित करणारे होते. बाकी इतर कलाकारांचे अभिनय आणि मकरंद देशपांडेंनी साकारलेली डॅडींची भूमिका लक्षात राहण्या इतकी बरी आहे. तर यानिमित्ताने अंकुश आणि पूजाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर तोच रोमान्स करताना पाहायला मिळाली.  चित्रपटातील गाणी म्हणाल तर इतकी कंटाळवाणी नसली तरी लक्षात राहारी नाही.

पहिल्या भागातील बरेच कलाकार हे दुसऱ्या भागातही पाहायला मिळाले. दगडी चाळ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला पण दगडी चाळ २ या भागात ‘चुकीला माफी नाही’ असं म्हणारे डॅडींच फार कमी वेळ स्क्रीनवर दिसले. अरुण गवळींच्य अर्थात डॅडींच्या जीवनारवर आधरित असलेल्या दगडी चाळ २ मध्ये डॅडींची म्हणावे  तितक दर्शन झाल नाही. त्यामुळे चित्रपट गृहातून बाहेर पडताना  प्रेक्षक म्हणत होते, दगडी चाळ बघायला आलेलो पण डॅडीं भेटलेच नाही. चित्रपट पाहून झाल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर येताना प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

अभिनेत्री तापसी पन्नूचा नवा चित्रपट दोबारा

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं आहे. दोबारा बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की ठराविक शैलीच्या चित्रपटांना प्रेक्षकांसमोर आणावं. प्रेक्षकांना आपल्या विवेकबुद्धीनुसार ती कथा समजून घ्यावी लागेल. चित्रपटाच्या कथेत ट्विस्ट बरेच आहेत, पण तुम्ही जर थ्रिलरचे शौकीन असाल तर ‘दोबारा’ चित्रपट नक्की पहा.

हेही वाचा : 

ओटीटीवर लवकरच रिलीज होणार ‘शमशेरा’

Latest Posts

Don't Miss