spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते ‘ब्रह्मचारिणी’ देवीची पूजा; जाणून घेऊयात स्वरूप,माहिती,पूजन आणि मंत्र

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते 'ब्रह्मचारिणी' देवीची पूजा; जाणून घेऊयात स्वरूप,माहिती,पूजन आणि मंत्र

शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात होत असते, यावर्षी घटस्थापनेची सुरुवात १५ऑकटोबरपासून झालेली आहे, नवरात्रोत्सवात देवीमातेच्या विविध नऊ रूपांची पूजा केली जाते. सोमवार, १६ सप्टेंबर २०२३ रोजी नवरात्रीची दुसरी माळ असून या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. जाणून घेऊयात ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप,माहिती,पूजन आणि मंत्र .

ब्रह्मचारिणी देवीचे स्वरुप

देवी ब्रह्मचारिणीची ओळख ही कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून आहे,बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे, ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने सिद्धी आणि भक्ती दोघांची ही प्राप्ती होते, असं सांगितलं जातं. हजारो वर्षाचं कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा मातेच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने तिच्या कठोर तपाचरणाने भगवान महादेवाला प्रसन्न केले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे जप,तप, वैराग्य, त्याग, संयम, ज्ञान आणि धैर्य प्राप्त होते, असं म्हटलं जातं.

देवी ब्रह्मचारिणीची महती

ब्रह्मचारिणी देवीने अन्न-पाण्याचा त्याग करून निर्जळी तपाचरण केले. यावर सर्व देवतांनी, ऋषी-मुनींनी देवी ब्रह्मचारिणीला महादेव शिवशंकराची पत्नी म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीची मनोभावे पूजा केल्याने विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य अर्पण केला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, समृद्धता,शांतता, आणि धर्म प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे. देवीच्या पुजनाने यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असे देखील सांगितले जाते.

ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र

सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म झाल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे मनोभावे पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून बनवण्यात आलेल्या गोड मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच पूजा व नैवेद्य समर्पण झाल्यास मनापासून, यथासंभव देवीच्या मंत्राचा शांततेने जप करावा, असे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र पुढीलप्रमाणे –

या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

हे ही वाचा: 

‘किंग’ कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट

फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या कार्यक्रमात १५६ तरुणांची फसवणूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss