spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर मनसेची नजर

राज्यातील मुख्य टोल नाक्यावर कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालं असून येत्या दोन दिवसात मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर सीसीटीव्ही लावण्यात येतील असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं.

राज्यातील मुख्य टोल नाक्यावर कॅमेरे बसवण्याचं काम सुरू झालं असून येत्या दोन दिवसात मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर सीसीटीव्ही लावण्यात येतील असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. राज्य सरकार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारकडून आता टोल नाक्यांवर सीसीटीवी लावण्यात येणार आहे. त्याचसोबत मनसेही आपले वेगळे सीसीसीव्ही कॅमेरे लावणार आहे.

मागील काही दिवसापासून मनसेकडून टोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्य टोल नाक्यावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुलुंड टोलनाक्याला भेट देत सीसीटीव्हीच्या संदर्भात पाहणी केली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारचे जे कॅमेरे आहेत ते काल रात्री लागले आहेत. आमचे कॅमेरे आहेत ते आजपासून लागायला सुरू होत आहेत. येत्या तीन दिवसात आमचे कॅमेरे हे मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर लागलेले असतील. त्याच्यानंतर टोल नाक्यांवरील गाड्या मोजायचं काम अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल.

मनसेच्या कॅमेऱ्यांचा टोलवर वॉच

राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होतेय का हे पाहण्यासाटी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल. तसेच या सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल, त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.

हे ही वाचा: 

‘टायगर 3’ मधला सलमान खानचा जबरदस्त लूक

आरोग्य विभागासाठी सरकारची उदासीनता का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss