spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटली आपली छोटीशी मायरा,पाया पडून घेतला आर्शिवाद

मायराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार म्हणून मायरा वायकुळने आपली ओळख निर्माण केली आहे.  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मायराने साकारलेल्या परी ची भुमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आणि मायराने देखील परी या  भुमिकेला चांगलाचं न्याय दिला. या भुमिकेमुळे मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. सध्या मायरी ही ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत झळकत आहे.तर मायरा मराठीतच नाही तर आता हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडत आहे.

दरम्यान  आता मायराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.मायरा वायकुळ ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने “ग्रेट भेट मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथ शिंदे  साहेब”, यांनी असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडीओत एकनाथ शिंदे मायरा सोबक छान गप्पा मारताना दिसून येत आहेत. त्यानंतर मायरा मोठ्या आदराने त्यांना वाकून पायाला हात लावून नमस्कार करताना पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच मायरा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोटो काढताना दिसत आहे.

मायरा ही देवीचे दर्शन घेताना आणि प्रसाद घेतानाही पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मायराच्या व्हिडीओवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. “ताई, मायराला संस्कार खूप छान दिलेत”, अशी कमेंट अनेकांनी यावर केली आहे.

दरम्यान मायरा सध्या कलर्स वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी  मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती नीरजा हे पात्र साकारत आहे. या मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ, काम्या पंजाबी झळकताना दिसत आहे.मायरा नेहमी सोशल मीडियावर अँक्टिव असल्याने ती नेहमी आपले अपडेट सोशल मीडियावर शेअर खरत असते,आणि तिच्या व्हिडीओवर तिचे चाहते देखील चांगलीच पसंती देत असतात,मायराचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.त्यामुळे मायराचे चाहते आता मायराला पुन्हा एखदा नवीन भुमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत.

हे ही वाचा : 

अभिनेता स्वप्नील जोशीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, घटस्थापनेच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिली गुडन्यूज

प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर ‘पठ्ठे बापूराव’चित्रपटातून पुन्हा एकत्र, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आलं समोर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss