spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बनावट जात प्रमाणपत्र वापरून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बाप-लेकीविरोधात सायनमध्ये गुन्हा

ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी २०२१ मध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट कागदपत्र दाखल केल्याने पुण्यातील दहा उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी २०२१ मध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट कागदपत्र दाखल केल्याने पुण्यातील दहा उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांनी बीड मधील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट कागद पत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई कऱण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील सायन रुग्णालयात बनावट जात प्रमाणपत्र दाखवून वैद्यकीय शिक्षण घेतल्याप्रकरणी बाप आणि लेकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जगदीश राठोड यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

काही दिवसांपूर्वी बीडमधून बोगस प्रमाणपत्र काढणाऱ्यांविरोधात विदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाच प्रकार आता पुण्यात देखील घडला आहे. पुण्यामध्ये बनावट प्रमाणपत्र बनवून पोलीस भरतीसाठी वापरल्याचे उघड झाले आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी पीजी नेट परीक्षेच्या क्रमवारीच्या यादीचे निरीक्षण केल्यानंतर राठोड यांना काही नावे लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ही सर्व नावे जातीशी पडताळून पाहिली. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी राठोड हे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसोबत काम करणाऱ्या डी अनिल साळुंके यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर डॉ.अंतरा रघुवंशी यांची जात पडताळून पाहिली.पण अंतरा ही त्या जातीची नसल्याचे साळूंखे यांनी स्पष्ट सांगितले. त्यानंतर राठोड यांनी संबंधित विभागातील माहिती अधिकार (आरटीआय) प्रक्रियेद्वारे चौकशी करण्यास सुरुवात केली. पण त्यांना अचूक माहिती मिळण्यास अडचणी येऊ लागल्या. प्रगती न झाल्याने हताश झालेल्यावर त्यांनी पुण्यातील बाबासाहेब संशोधन प्रशिक्षण केंद्राला (बार्टी) पत्र लिहिले.

 राठोड यांचं पत्र बार्टी येथून नाशिक मधील जात प्रमाणपत्र समितीकडे पाठवण्यात आले. नंतर समितीने ते पत्र अंतराने प्रवेश घेतलेल्या इगतपुरी येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजला पाठवले. डॉ. अंतरा अनिल रघुवंशी यांच्या जात प्रमाणपत्राची विनंती केली. समितीने तपासणी केल्यानंतर रघुवंशी यांनी दिलेल्या प्रमाणपत्राशी जुळणारी कोणतीही नोंद आढळली नाही. अंतरा अनिल रघुवंशी यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्यामुळे डॉ.राठोड यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सायन पोलिसांनी डॉ. अंतरा रघुवंशी आणि तिचे वडील डॉ. अनिल रघुवंशी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३४, ४२०, ४६५, ४६६, ४६८आणि ४७१ नुसार एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा: 

प्रदूषणापासून नुकसान होणाऱ्या त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा….

मराठी स्टार Mansi Naik ने टाईम महाराष्ट्रच्या दुर्गोत्सवात लालबागच्या दुर्गामातेचं दर्शन घेतलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss