spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्सचा धंदा, मुंबई गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई

मागील काही महिन्यांपासून मुंबई, पुणे, सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरात ड्रग्जची तस्करी केली आहे.

मागील काही महिन्यांपासून मुंबई, पुणे, सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरात ड्रग्जची तस्करी केली आहे. तसेच आता मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्सचा बेकायदेशीर धंदा मागील काही दिवसांपासून चालू होता. गेल्या अनके वर्षपासून बंद असलेल्या एका कंपनीत ड्रग्स तयार करण्यात येत होते. याची माहिती मुंबई शाखेच्या गुन्हे पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली. छापेमारी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कंपनी बंद करून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे.आठ किलो एमडी ड्रग्सची किंमत तब्बल १६ कोटी रुपये एवढी आहे.

या संपूर्ण घटनेमुळे सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे २०१६ साली सोलापुरातील याच चिंचोळी एमआयडीसी परिसरातील अवोन लाईफ साईन्सेस नावाच्या कंपनीमध्ये ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रीन ड्रग्सचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी तब्ब्ल १८ हजार ६२३ किलो ड्रग्स जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सोलापूरमध्ये अशी कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

मनोज जरांगे यांनी सरकारला दिला इशारा

बनावट जात प्रमाणपत्र वापरून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बाप-लेकीविरोधात सायनमध्ये गुन्हा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss