spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवानी रांगोळेने मराठमोळ्या अंदाजात शेअर केला जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील फोटो

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिकेत नुकतच अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला .तर आता ते दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. त्यानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या  लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. आणि मालिका म्हटलं तर ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळणारचं.तर  या मालिकेत नुकतंच अक्षरा आणि अधिपती यांचं लग्न झालं. तर आता ते दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं मालिकेत दाखवण्यात येणार आहे. त्यानिमित्त शिवानीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

शिवानी रांगोळे या मालिकेत अक्षराची भूमिका साकारत आहे.तर ऋषिकेश शेलार अधिपतीच्या भूमिकेत दिसून येत आहे. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न जरी राजेशाही थाटात झाले असले तरी या लग्नात अनेक अडथळे पाहायला मिळाले.दरम्यान लग्नानंतर देखील अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच आता मालिकेत हे दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. त्यामध्ये अधिपती अक्षराला उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे.या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर  भंडारा,नाकात नथ,नऊवारी साडी असा संपुर्ण लूक या शूटिंग साठी केला आहे.. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “येळकोट येळकोट जय मल्हार!

आता तिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलेच व्हायरल होत आहे. या भागाच्या प्रोमोमुळे आणि शिवानीच्या या पोस्टमुळे प्रेक्षक या आगामी भागाबद्दल खूप उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत.मालिकेच्या आगामी भागात आपल्याला अक्षरा आणि अधिपती यांचे देव दर्शन कसं होतय,की देवदर्शन करताना ही या दोघाना कोणत्या संकटांना सामोर जावं लागतय का देवदर्शन व्यवस्थित होईल की नाही हे पाहणं आता औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

मनोज जरांगे यांनी सरकारला दिला इशारा

बनावट जात प्रमाणपत्र वापरून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बाप-लेकीविरोधात सायनमध्ये गुन्हा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss