Navratri २०२३:- नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह. नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या कालावधीत सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या उत्सवातील नऊ रंगांना विशेष महत्व आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. नवरात्री मध्ये नऊ देवीच्या रूपांची पूजा केली जाते. या उपवासामध्ये साबुदाणे, बटाट्याची भाजी हेच पदार्थ खाल्ले जातात. पण जर तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही उपवासाचे बटाटा कबाब बनवू शकता.चला तर पाहुयात बटाट्याचे कबाब कसे बनवायचे याची रेसिपी.
साहित्य:-
बटाटे
शिंगाड्याचे पिठ
दही
हिरवी मिरची
हिरवे धणे
हिरवे धणे
जिरे पावडर
सुका मेवा
तेल
कृती:-
सर्वप्रथम बटाट्याचे कबाब बनवण्यासाठी बटाटे उकळून घ्या. बटाटे उकडून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या. त्यानंतर ते बटाटे मॅश करून घ्या. मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घाला. त्यानंतर बटाटे पुन्हा मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात शिंगाड्याचे पीठ आणि मीठ टाकून ते नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर त्या मिश्रणाचे गोळे करून घ्या. तुम्ही कबाब गोलाकार बनवू शकता किंवा अंडाकृती हवे असतील तर त्याला तसा आकार द्यावा. मिश्रणाचे सर्व कबाब बनवून घ्या.आता एक कढई घ्या आणि त्यात तेल टाका. तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात बटाट्याचे कबाब तळून घ्या. कबाब दोन्ही बाजूने सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्या. यानंतर बटाट्याचे कबाब एका प्लेटमध्ये काढा. हे कबाब तुम्ही दह्यासोबत सर्व्ह करू शकता. तयार आहेत बटाट्याचे कबाब.
हे ही वाचा:
अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वे स्थानकांत रेल्वेच्या डब्यांना आग
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, दिवाळी साजरी करणार नाही, मला शेतकऱ्यांच्या वेदना…