spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘आम्ही जिथे उभे राहतो तिथून रांग सुरु होते’ – आशिष शेलार

मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ता सत्कार सोहळा पार पाडलाय. या सत्कार सोहळ्यात भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ता सत्कार सोहळा पार पाडलाय. या सत्कार सोहळ्यात भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आणि म्हणाले, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजा विराजमान नाही, यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार आहे. मी तिसऱ्यांदा मुंबई भाजप अध्यक्ष झालो. एका समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवलं आहे. गिरणी कामगारांना घर मिळालंच पाहिजे. टोल नाक्यावर संघर्ष करणारे लोढा पाहिजेत.’ तसेच पुढे आशिष शेलार यांनी टोल, रस्ते, खड्डे आणि पुनर्विकासावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला चढवला आहे. आम्ही जिथे उभे राहतो तिथून रांग सुरु होते. असे वक्तव्य आशिष शेलार यांनी करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

तसेच पुढे आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला. येणाऱ्या पालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपाचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकले आहेत. त्यामुळे वरळी जांभोरी मैदानात त्यांनी साधी परवानगी देखील घेतली नाही. वरळीतच नाहीं तर संपूर्ण मुंबईत भाजपच सत्ता मिळवणार आहे. आमच्याच पाठिंब्यावर वरळीत तुम्ही निवडून आलात विसरू नका, असा टोला आशिष शेलार यांनी आधीही लगावला होता. ते मुंबईतील दहीहंडी उत्सवामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

मुंबईत पार पडलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजप नेते कामाला लागले आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्यासह प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा :-

मुंबईला धमकीचा मॅसेज आल्याप्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे स्पष्टीकरण

आमच्या स्वार्थासाठी आम्ही कधीही युती तोडणार नाही, दीपक केसरकारांचे वक्तव्य

Latest Posts

Don't Miss