spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींची भावूक पोस्ट म्हणाले, पापा आप हर पल मेरे साथ…

भारताचे माजी पंतप्रधान, राजीव गांधी यांची आज ७८वी जयंती. यानिमित्त आज शनिवारी वीर भूमी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. १९९१ ,साली एलटीटीई दहशतवाद्यांनी त्यांनी हत्या केली. यापूर्वी राजीव गांधी १९८४ ते १९८९ दरम्यान भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून काम केले.राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “बाबा, तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहात, माझ्या हृदयात. मी नेहमीच प्रयत्न करेन की तुम्ही देशासाठी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करू शकेन.” असे भावूकपूर्ण पोस्ट त्यांनी आपल्या ट्विटरवर केली.

माजी पंतप्रधानांच्या वारशाचे स्मरण करून , काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने ट्विट केले की , “आम्ही भारताचे माजी पंतप्रधान, राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मनापासून स्मरण करतो. ‘२१ व्या शतकातील भारताचे शिल्पकार’ म्हणून गौरवले गेले, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारतात आयटी आणि दूरसंचार क्रांतीची सुरुवात झाली.

‘मुंबई पालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा दिसणार’ ,देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॅबिनेट मंत्री टिकाराम जुईले म्हणाले, दिवंगत राजीव गांधी यांनी देशात दळणवळण क्रांती आणि आयटी क्षेत्रात पुढे आणण्याचे काम केले. संगणक आणि दूरसंचार क्षेत्रात देशात पहिले स्थान जे आज देशाने मिळवले आहे. त्यांचे वडील दिवंगत राजीव गांधी होते. पंचायती राज संस्था, नागरी संस्थांच्या बळकटीकरणासाठी दोन दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे लोकांना पंचायती राज आणि शहरी संस्थांमध्ये आरक्षण मिळाले आहे. यासोबतच काँग्रेस हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करणार आहे.

मेवात विकास मंडळाचे अध्यक्ष झुबेर खान म्हणाले की, देश आज प्रगतीच्या शिखरावर आहे, याचे श्रेय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जाते. दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करावी, असे म्हणत जुबेर खान यांनी भाजपवर निशाणा साधला.

हेही वाचा :

‘आम्ही जिथे उभे राहतो तिथून रांग सुरु होते’ – आशिष शेलार

Latest Posts

Don't Miss