spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोमालियातील मोहादिशू येथे २६/११ सारखा हल्ला, हॉटेलमध्ये उपस्थित सर्व दहशतवादी ठार

सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील एका प्रसिद्ध हॉटेलवर रात्री उशिरा झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण शहर हादरले. सशस्त्र हल्लेखोरांनी कार बॉम्बस्फोटाद्वारे हा हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 12 लोक ठार झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हयात हॉटेलमध्ये अजूनही दहशतवादी लपून बसले आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरूच आहे.आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने सोमालिया हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. दहशतवादी खूप वेळ इमारतीत लपलेले होते. किती नुकसान झालंय याची डिटेल्स आमच्याकडे नाही. पण मोठं नुकसान झालं आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांशी लढत आहेत. अतिरेक्यांना इमारतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सुरक्षा अधिकारी अब्दुलकादिर हसन यांनी म्हटल्याचं अल जजीराच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हल्लेखोरांनी दोन कारमध्ये बॉम्बस्फोट केले आणि गोळीबारही केला. दोन कार बॉम्बमध्ये, एक कार हॉटेलजवळील बॅरियरला धडकली आणि दुसरी हॉटेलच्या गेटवर आदळली. दोन्ही गाड्यांमध्ये मोठा स्फोट झाल्याच्या आवाजाने लोकांमध्ये घबराट पसरली. हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात आतापर्यंत १२ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश नागरिक आहेत. हॉटेलमध्ये अनेक स्फोटांचे आवाजही ऐकू आले.

हेही वाचा : 

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींची भावूक पोस्ट म्हणाले, पापा आप हर पल मेरे साथ…

Latest Posts

Don't Miss