spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुमच्यातही विसराळूपणा वाढतोय का? मग आता विसराळूपणा विसरा…

काही लोकांना नको नको ते सगळे लक्षात राहते, पण काही लोकांना मात्र लहानसहान गोष्टी विसरण्याची सवय असते. त्यामुळे नातेसंबंधात, घरात, कामाच्या ठिकाणी अनेक गोंधळ होऊ शकतात.

काही लोकांना नको नको ते सगळे लक्षात राहते, पण काही लोकांना मात्र लहानसहान गोष्टी विसरण्याची सवय असते. त्यामुळे नातेसंबंधात, घरात, कामाच्या ठिकाणी अनेक गोंधळ होऊ शकतात. एखादी वस्तू, काम, एखादी महत्वाची गोष्टी विसरणे असे अनेक प्रकार असतात. यामुळे आपले नुकसान होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारापासून (Diet) व्यायामापर्यंत अनेक गोष्टी उपयोगी पडतात. व्यायामानंतर लगेच डुलकी काढल्यानं स्मरणशक्तीसाठी वाढण्यास मदत होते, असं अनेक संशोधनांती सिद्ध झालं आहे. वय झाले की, विसरणे हे समजून घेतले जाते पण तरूण वयातही अनेक गोष्टी विसरणारे आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. गोष्टी विसरू नयेत आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी काही उपाय :

  • उलटे चाला – उलटे चालणे हा विसराळूपणावरचा एक उत्तम उपाय ठरू शकतो. यामागचे नेमके कारण काय ते अद्याप न्यूरोसायन्सचा अभ्यास कऱणाऱ्यांनाही सापडलेले नाही. पण लंडनमधील एका विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार उलटे चालल्यामुळे व्यक्तींचा विसराळूपणा कमी होतो हे सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या अभ्यासात उलटे चालणाऱ्या व्यक्तींना पूर्वी पाहिलेले चित्रपट, चित्रे, शब्द जास्त चांगले आठवत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
  • ​स्वतःशी संवाद साधा – स्वतःशी बोलणं ही चांगली सवय आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. याला प्रॉडक्शन इफेक्ट असं म्हणतात. ऐकणं आणि बोलणं या दोन कृती एकाच वेळी पार पडत असल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
  • भाज्या आणि फळे खाणे वाढवा – एका सर्वेक्षणानुसार, आपला आहार आणि आपली स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. जास्त प्रमाणात भाज्या आणि फळे खाल्ल्यास विसराळूपणा कमी होण्यास उपयोग होतो. यामध्ये हिरव्या, लाल, केशरी अशा सगळ्या रंगांची फळे असायला हवीत. तसेच सॅलेड, पालेभाज्या, फळभाज्या अशा सगळ्या भाज्यांचाही समावेश होतो. हे सगळे उतारवयात तर खायला हवे पण तरुण वयात याचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असायला हवा.
  • गाणी गुणगुणा – गाणं गाताना मेंदूचा उजवी बाजू वापरली जाते, त्यामुळे समस्येचं निराकरण करण्याची क्षमता वाढते. नवीन गाण्याचे शब्द लक्षात ठेवणं, कठीण असलं तरीही तो एक प्रकारचा व्यायाम आहे. त्या मेंदूला फायदा होतो.
  • ​ध्यानधारणा करा – दिवसातील पंधरा ते तीस मिनिटं ध्यानधारणा आणि योग करणाऱ्या व्यक्तींची स्मरणशक्ती उत्तम असते, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे दृष्टिकोनात बदल होऊन सकारात्मक विचार करण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञही ध्यानधारणा करण्याचा सल्ला देतात.

 

हे ही वाचा :-  

 खिलाडी अक्षयचा “कठपुतळी” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Latest Posts

Don't Miss