spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pankaja Munde यांच्या भाषणानंतर भाजपच्या ‘या’ नेत्याची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले…

पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

काल दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी च्या नेत्या आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा पार पडला. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विजयादशमी (Vijayadashami) च्या शुभमुहूर्तावर बीड (Beed) मधील सावरगाव (Sawargaon) येथे आयोजित दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2023) जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. तसेच भगवान गडावरील या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा मुंडे मनातील खदखद बोलून दाखवली आहे. यावेळी बोलत असताना त्या म्हणाल्या होत्या की, दुसऱ्या पक्षात जाण्याइतपत मी लेचीपेची नाही. तसेच त्यांनी जाहीरपणे पक्षांतर करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यांवर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले आहेत की, पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केल ते पक्षाच्या संदर्भात नसेल. मी नेमकं त्याच भाषणं ऐकलं नाही. ऐकल्या नंतर काय ते बोलत येईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे यावेळी अमलीपदार्थांच्या मुद्द्यावरून त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. त्यांचेही सरकार होते. त्यांचे नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे सुद्धा पाहावं.मातोश्रीवर त्या ललित पाटीलचा प्रवेश झाला. असं असताना आमच्यावर बेछूट आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही काहीही बोलला तरी लोकांना काय ते कळते. अमलीपदार्थांची तस्करी हा विषय मुळापासून संपवण्यासाठी सरकारने काम सुरू केलं आहे. त्यामुळे अमलीपदार्थांची तस्करी किंवा त्या व्यवसायात कुणी राजकीय पदाधिकारी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असेल किंवा सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. जो कोणीही असेल आम्ही त्याला सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गिरीश महाजन यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचं एकमत झालं आहे. सरसंघचालकांनी आमच्यासोबत यावं, असं राऊत यांनी म्हणणं म्हणजे वेड्या माणसाने बरळण्यासारखं आहे. वाटेल तसं, वाटेल ते बोलायचे. त्यामुळे या माणसाच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे, असं सर्वपक्षीय लोकांचे एकमत झाले आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. ठाकरे गटात केवळ चार पाच लोक शिल्लक राहिले आहेत. असं असताना संजय राऊत नको ती विधाने करत आहेत. हे असंच सुरू राहिलं तर त्यांच्या पक्षात केवळ दोनच लोक शिल्लक राहतील असं मला वाटतं, असा दावाही महाजन यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss