spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘झिम्मा२’ मध्ये झळकणार अभिनेत्री रिंकू आणि शिवानी 

रिंकू आणि शिवानी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

बहुप्रतिक्षित ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच बाजी मारली होती.या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळीच जागा निर्माण केली होते. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, याची उत्सुकता अनेक प्रेक्षकांना लागली होती. अखेर ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वेही झळकणार आहेत. त्यांचे एक पोस्टरही समोर आले आहे.

‘झिम्मा’ या चित्रपटाच्या पहिल्या भागात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री झळकल्या होत्या. नुकतंच ‘झिम्मा २’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. या नव्या पोस्टरवर सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग यांच्याबरोबर रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकत आहेत. त्याबरोबरच यात सिद्धार्थ चांदेकरही पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात रिंकू राजगुरु झळकणार हे पाहिल्यावर अनेक चाहते कमेंट करत विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टरवरील पोस्टवर एकाने कमेंट केली आहे. “मी अजून प्रतीक्षा करु शकत नाही. मी आशा करतो की रिंकू राजगुरु या चित्रपटाची मज्जा घालवणार नाही”, असे एकाने म्हटले आहे.त्यावर सिद्धार्थने “नाही, असे अजिबात होणार नाही. तिने कडक काम केलं आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही कमेंट सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस, नवीन ट्रीपचे प्लॅनिंग आणि एक सरप्राईज असा सस्पेन्स पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग यांच्याबरोबर रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे झळकणार आहेत. यात रिंकू आणि शिवानी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.यामुळे प्रेक्षकंची चित्रपट पाहण्याची उत्सुकत्ता वाढली आहे.

हे ही वाचा : 

मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा : गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss