spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

तरी "साद घातली तर येऊ देत", हे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यामुळे शिवसेनेला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आणि त्यामुळे शिवसेनेला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेच्या हातून सत्ता गेल्यापासून मनसे आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांमधून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करावी आणि एकत्र यावे असे सूर उमटत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती करण्याबाबत जेव्हा पुण्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला ठाकरे या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या की, “साद घातली तर येऊदेत.” त्यांच्या या उत्तरामुळे आता ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का?’ अशा चर्चांना तोंड फुटले आहे. तसेच या युतीसाठी शिवसेना पुढाकार घेईल असा आत्मविश्वासदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

जरी शर्मिला ठाकरेंनी युतीबद्दल काही स्पष्ट सांगितले नसते तरी शिवसेनेने जर साद घातली तर याबाबत विचार करण्यात येईल, असे संकेत त्यांनी या वक्तव्यातून दिले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याबद्दलही त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारलेला असताना शुभेच्छा आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी “साद घातली तर येऊ देत”, हे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांना या वक्तव्याबाबत विचारणा केली असता, शिवसेनेकडे अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जरी प्रस्ताव आला तरी याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील. यापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज ठाकरेना भेटले आहेत. त्यांना भेटून आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मात्र असे असले तरी आम्हाला युतीबाबतचा काही प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षप्रमुख निश्चित विचार करतील. असे मत त्यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

उद्या ठरणार ‘शिवसेना’ नक्की कुणाची; उद्धव ठाकरे म्हणतात, जे व्हायच ते होईल…

Latest Posts

Don't Miss