spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

UPI व्यवहारांवर सरकार शुल्क आकारणार का ? केंद्रीय अर्थमंत्र्याचे स्पष्टीकरण

युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे डिजिटल व्यवहार करण्याचे उत्तर पर्याय आहे. यामुळे कॅश व्यवहारचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनद्वारे युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणे खूप सोपे झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे (RBI) पूर्णपणे नियमन केले जात असल्यामुळे मनी ट्रान्सफर खूप विश्वासार्ह आहे. पण सोशल मीडियावर चर्चा होत होती, की सरकार UPI पेमेंटवर शुल्क आकारणार आहे. संदर्भात अर्थ मंत्रालयाने पुढे येऊन या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

अर्थ मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की UPI हा सार्वजनिक डिजिटल हिताचा विषय आहे. सामान्य जनता आणि उत्पादकतेच्या पातळीवर चांगल्या सुविधा दिल्या आहेत. हे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे. UPI सेवांवर शुल्क आकारण्याबाबत सरकारमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत सेवा प्रदात्यांच्या खर्चाच्या वसुलीचा संबंध आहे, तो इतर माध्यमातून भागवला जाईल. खर्च वसुलीसाठी सेवा प्रदात्यांच्या चिंतेची पूर्तता इतर मार्गांनी करावी लागेल. अर्थ मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अधिवेशनाचा आज तिसरा दिवस ; सत्ताधारी – विरोधकांचा पुन्हा एकदा रंगणार सामना

काही दिवसांपूर्वी, रिझर्व्ह बँकेने UPI पेमेंट आणि शुल्काबाबत लोकांकडून फीडबॅक मागवला होता. यासाठी सल्लापत्रही शेअर करण्यात आले. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की सरकार UPI देखील चार्ज करणार आहे, परंतु आता अर्थ मंत्रालयाने यावर सर्व काही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

Latest Posts

Don't Miss