spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विनायक मेटेंच्या अपघातावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित, फडणवीसांनी नेत्यांना दिला सल्ला

आज राज्यातील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच तिसरा दिवस सुरु आहे. आज विधानसभेत वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे, असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल उपस्थित केला. यावर राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत. इतर नेत्यांना सल्ला दिला आहे.

भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर सरकारने सकारात्मक पाऊले उचलेल. ड्रायव्हरचा जबाब बदलत आहे. घातपात आहे की नाही याची शंका उपस्थित होऊ नये म्हणून सीआयडी याचा तपास करत आहे. यात शासकिय मदत मिळण्यास काही त्रूट झाली आहे का ? याचाही स्वतंत्र तपास केला जाईल. मंत्री आणि आमदार यांनी शक्यतो रात्रीचे प्रवास टाळा. या अपघातातून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

UPI व्यवहारांवर सरकार शुल्क आकारणार का ? केंद्रीय अर्थमंत्र्याचे स्पष्टीकरण

अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होईल अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल, अशी यंत्रणा उभी करणे आता गरजेचं असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : 

शिंदे – ठाकरे गट सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

Latest Posts

Don't Miss