spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना आणि मनसे युती ? आज राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांन सोबत बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळत आहे. कारण लवकरच राज ठाकरे (Raj Thackeray) पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. आज सोमवारी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. तर २३ ऑगस्टला मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. त्यात आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी काल एक सूचक विधान केलं होतं.

ओबीसी आरक्षणाची आज ‘दुसरी परीक्षा’

उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असं विधान शर्मिला ठाकरे यांनी केलं. त्यांची साद आली तर पाहू. पण त्यांची साद आधी येऊ द्या, असे देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शर्मिला ठाकरे यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित करण्यास प्रयत्न केलाय, असं म्हणालया वावगं ठरणार नाही. पण त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

राज ठाकरे मुंबईत २२ तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि त्यांनतर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. तर २३ तारखेला राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत १०० वॉर्ड वर मनसे लक्ष केंद्रित करणार आहे. यासोबतच ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकेवर देखील सत्तेच्या समीकरणात मनसे असेल असा विश्वास पक्षाला आहे.

हेही वाचा : 

विनायक मेटेंच्या अपघातावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित, फडणवीसांनी नेत्यांना दिला सल्ला

Latest Posts

Don't Miss